![]() |
प्रतिभा वर्मा |
नवी दिल्ली : राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून देशभक्ती,सेवाभावी वृत्ती, संवेदनशीलता व दिव्य भव्य स्वप्न पाहण्याची डोळसपणा हा राष्ट्रीय सेवा योजने(NSS)मुळे येत असतो. त्याचाच परिणाम म्हणून प्रतिभा वर्मा यांच्या या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची जडणघडण या माध्यमातून झाली. हे अगदी प्रामाणिकपणे ते मान्य करतात.
आयएएस अधिकारी प्रतिभा वर्मा या सुलतानपूरच्या रहणाऱ्या आहेत. २०१९ मध्ये युपीएससी परीक्षेमध्ये (UPSC Exam) मेहनतीच्या बळावर ३ री रँक मिळवत महिलांमध्ये टॉपर होत्या. सुलतानपूर मध्येच त्यांचं प्राथमिक शिक्षण झालं. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार असल्याने शाळेत आणि कॉलेजमध्ये देखील टॉपर राहिल्या. एनएसएसमध्ये (NSS) असताना त्यांनी आयएएस ऑफिसर (IAS Officer) होण्याचं स्वप्न पाहिलं. बारावी मध्ये चांगल्या गुणांनी पास झाल्यानंतर त्यांनी आयटी दिल्लीमधून (IIT Delhi) B.Tech डिग्री मिळवली.
ग्रॅज्युएशन नंतर एका खासगी कंपनी मध्ये २ वर्ष काम केलं. त्यानंतर एका एनजीओमध्ये (NGO) काम करत असताना त्यांना देशसेवेची प्रेरणा मिळाली आणि आपल्या मागे पडलेल्या स्वप्नाची आठवण झाली. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची (UPSC Exam) तयारी सुरू केली. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी युपीएससी परीक्षेमध्ये यशही मिळवलं.
देण्याचा निर्णय घेतला. २०१९ मध्ये UPSC परीक्षेत त्यांनी दुसरी रँक मिळवली.
UPSC परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिभा यांनी ऑप्शनल सब्जेक्ट निवडतांना विचारपूर्वक निवड करण्याचा सल्ला दिलेला आहे. ग्रॅज्युएशनमध्ये ज्या विषयाचा आपण अभ्यास करतो तोच ऑप्शनल सब्जेक्ट निवडला तर फायदा होतो असं प्रतिभा सांगतात. प्रतिभा यांनी ३ वेळा UPSC परीक्षा दिली २ वेळा आलेल्या अपयशाचा अभ्यास करूनच त्यांनी तिसऱ्या वेळी पूर्ण मेहनतीने अभ्यास केला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा