Breaking

बुधवार, ७ जुलै, २०२१

धक्कादायक ❗ राजस्थानात RSS च्या नेत्यावर भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप




 

जयपुर - राजस्थानात तेथील सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरीष्ठ नेत्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदवला आहे. त्याचा घरोघरी कचरा वेचण्याच्या कामातील कंत्राटदाराकडून 20 कोटी रूपयांचे कमिशन घेतल्याचा प्रकरणात सहभाग आहे असा आरोप आहे. निंबाराम असे या नेत्याचे नाव आहे.

            या प्रकरणात जयपूर महापालिकेचे महापौर सौम्या गुर्जर यांचे पती राजाराम गुर्जर आणि बीव्हीजी कंपनीच्या प्रतिनिधीला अटक करण्यात आली आहे. राजाराम गुर्जर आणि बीव्हीजी कंपनीचा प्रतिनिधी यांच्या 20 कोटी रूपयांच्या कमिशनच्या संबंधातील दूरध्वनीवरील बोलणे सोशल मिडीयात व्हायरल झाले आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे.

       या घटनेमुळे संपूर्ण राजस्थान  खळबळ माजली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा