Breaking

गुरुवार, ८ जुलै, २०२१

पश्चिम मध्य रेल्वेमध्ये स्टेशन मास्टर (Station Master)पदासाठी भरती






नवी दिल्ली, जुलै: पश्चिम मध्य रेल्वेमध्ये (Western-Central railways) लवकरच मोठी पदभरती होणार आहे. स्टेशन मास्टर (Station Master Recruitment) पदासाठी ही भरती होणार असून त्यासाठीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार स्टेशन मास्टरच्या एकूण 38 जागा रिक्त आहेत. यात 18 जागा या अनारक्षित प्रवर्गासाठी (Open Category) आहेत तर इतर 20 जागा या आरक्षित प्रवर्गासाठी आहेत. या पदभरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2021 असणार आहे.

या पदासाठी पदभरती

स्टेशन मास्टर (Station Master) - एकूण जागा 38

कोणासाठी किती जागा

अनारक्षित वर्ग (Open)- 18

SC  - 5

ST  - 3

OBC  -12

शैक्षणिक पात्रता

या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी कोणत्याही फिल्डमधून डिग्रीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा

अनारक्षित श्रेणी - 18 ते 40 वर्षे

OBC  - 18 ते 43 वर्षे

SC/ST - 18 ते 45 वर्षे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा