शशिकांत घाटगे : जांभळी प्रतिनिधी
जांभळी ग्रामपंचायतीकडून कोरोनाला अटकाव करण्यासाठी नागरिकांची एंटीजन रॅपिड व rt-pcr टेस्ट 26 जणांची करण्यात आली.एंटीजन रॅपिड टेस्ट करून घेण्यासाठी नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळत आहे. आज पर्यंत 382 जनांची कोरोना टेस्ट करण्यात आली.चालू वर्षी दुसऱ्या लाटेमध्ये बाधित रुग्णांची संख्या ही 119 असून त्यामध्ये बरे झालेले रुग्ण 109 व उपचार घेणारे 4 तसेच कोरोनाने मृत्यू झालेले 6 असे आहेत.
कोरोना टेस्ट करून घ्यावी यासाठी जांभळीतील तलाठी सौ.शेडशाळे मॅडम, आरोग्य सेवक व्ही.एस.शिंदे, आरोग्य सेविका ए.एन.मेवेकरी, मदतनीस सौ. रेहाना मुजावर अशा सेविका, सौ.कमल कोरे, सविता फारणे, सिया लॅब जांभळी, नम्रता घाटगे,अभिषेक लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य जयपाल कांबळे, आरपीआय तालुकाध्यक्ष गावकामगार पाटील राजीव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते राजेश कोळी,शशिकांत घाटगे व ग्रामपंचायत क्लार्क विजय चव्हाण यांचे सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा