प्रा. मनोहर कोरे : सांगली जिल्हा प्रतिनिधी
आज साहित्य सम्राट व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 101 वी जयंती गंगापूर तेरवाड येथे उत्साहात साजरी करण्यात आली.
या वर्षी कोरोना पाठोपाठ कृष्णा,पंचगंगेला महापूर आला या संकटात ग्रामपंचायत अधिकारी, कर्मचारी, नगरपालिका अधिकारी व कर्मचारी तसेच महावितरण अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिस व पत्रकार बंधु यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे, म्हणुनच आज जयंतीनिमित्त कै. गोविंद बंडू आवळे सोशल फौंडेशन यांच्या वतीने व गंगापूर मातंग समाज संघटनेच्या सहकार्याने कुरूंदवाड मधील नगरपालिका अधिकारी व कर्मचारी, पोलिस अधिकारी,तसेच महावितरण अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या प्रामाणिक कार्याबद्दल जिलेबीचे वाटप करण्यात आले, या प्रसंगी शिरोळ तालुक्याचे राज्यमंत्री नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर ,नगराध्यक्ष जयराम बापु पाटील, माज नगराध्यक्ष मा,रामभाऊ डांगे तात्या, उपनगराध्यक्ष मा, सुनिल चव्हाण सर, नगरसेवक अक्षय आलासे, अनुप मधाले,उदय डांगे, दिपक गायकवाड, पोलिस निरीक्षक मा.निरावडे साहेब, उपनिरीक्षक मा. अमित पाटील साहेब, मा.उगलमुगले साहेब,तेरवाड च्या ग्रामपंचायत सदस्य श्रीमती शोभा गोविंद आवळे, महावितरण अधिकारी प्रियंका पाटील मँडम व सलिम दबासे व पत्रकार बंधु उपस्थित होते,
सर्वांना मान्यवरांच्या हस्ते जिलेबी वाटप करण्यात आले या प्रसंगी कै. गोविंद बंडू आवळे सोशल फौंडेशनचे अध्यक्ष उमेश आवळे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या बद्दल माहिती व प्रस्तावना केली व त्यानंतर सुनील चव्हाण सर आणि रामभाऊ डांगे तात्या यांनी मनोगत व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे आभार मा.जयरामबापु पाटील यांनी मानले. हा सामाजिक कार्यक्रम गंगापूर मातंग समाज संघटनेच्या वतीने आयोजित केला होता ह्या साठी, उमेश शेडबाले, शशिकांत सनदी, मुरग्याप्पा हेगडे, सुखदेव हेगडे, श्रीकांत हेगडे, बाळू शेडबाले, रवी शेडबाले, तुकाराम आवळे,सुरेश शेडबाले, आदित्य मोरे, नामदेव आवळे, शिवाजी मांग, कैलास मोरे ,संजय कांबळे यांनी सहकार्य केले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा