प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक
कोरोना महामारीला अटकाव करण्यासाठी व विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता शिवाजी विद्यापीठ परीक्षा विभागाने गेल्या शैक्षणिक वर्षापासून विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने अत्यंत उत्तम पद्धतीने नियोजनपूर्वक पार पाडल्या आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील मार्च / एप्रिल २०२१ उन्हाळी सत्रातील विविध अभ्यासक्रमाच्या परीक्षा जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दि. १० ऑगस्ट २०२१ पासून ऑनलाईन प्रॉक्टरिंग पध्दतीने प्रारंभ झालेल्या आहेत. मात्र या शैक्षणिक वर्षात शिवाजी विद्यापीठ परीक्षा विभागाची उल्लेखनीय कामगिरी म्हणजे रविवार दि.29/8/2021रोजी 'पर्यावरण अभ्यास' या विषयाची सर्व पदवी स्तरावर भाग 2, सत्र 4 च्या आवश्यक पेपरची परीक्षा प्रथमच एकाच वेळी एकूण 50557 विद्यार्थ्यांनी देऊन विद्यापीठाच्या परीक्षा विभागाच्या इतिहासातील महत्वाची कामगिरी पार पाडली आहे.
ऑनलाइन प्रकारच्या परीक्षेतील ही सर्वोच्च कामगिरी आहे. सदर परीक्षेची ठळक वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे
1. पर्यावरण अभ्यास सर्व पदवी स्तरावर भाग 2, सत्र चार मधील आवश्यक पेपर आहे. परीक्षा कालावधी 12.30 ते 1.30
2. कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील पदवी स्तरावरील सर्व 273 महाविद्यालयांचा समावेश.
3. एकुण नोंदणीकृत परीक्षार्थी संख्या 52257
4.यासाठी सर्व विद्यार्थ्यांना पुनश्च युजर आयडी व पासवर्ड SMS द्वारा व इ मेल द्वारा पाठविण्यात आले. परीक्षेसाठी आवश्यक असणारी ऑनलाईन एक्झाम ची लिंक, अँड्रॉइड ॲप ची लिंक, युजर मॅन्युअल, एफ ए क्यू तसेच तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून संगणक व मोबाईल मधील तांत्रिक सेटिंग बाबतचा व्हिडिओ, ऑनलाईन परीक्षा कशी द्यावी याबाबत चा डेमो व्हिडिओ, परीक्षा विभागाचे व हेल्पलाइन व्यवस्थेचे संपर्क क्रमांक पुनश्च पाठवण्यात आले.
5.सर्व विद्यार्थ्यांनी सदरची आवश्यक असणारी परीक्षा द्यावी यासाठी *प्रथमच व्हॉइस मेसेज* पाठविण्यात आला.
6. सर्व विद्यार्थ्यांना *प्रथमच संगणकीय सॉफ्टवेअर द्वारा ऑटोमेटेड व्हॉइस कॉल* करण्यात आले.
7.तसेच सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षक व प्रशासकीय सहकारी यांच्या व्हाट्सअप ग्रुप वरती विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी यासाठी आवाहन करण्यात आले.
8 परीक्षा चालू असताना सकाळी 9.00 वाजल्यापासून कंपनीची हेल्पलाइन ऍक्टिव्ह करण्यात आली.
9.यामध्ये हेल्पलाईन क्रमांक यांची संख्या वाढविण्यात आली तसेच विद्यापीठ विभागातील सर्व परीक्षा विभागातील कर्मचारी आवश्यकतेनुसार विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी व तांत्रिक अडचणीवर मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.
10. परीक्षेसाठी अर्ज भरलेली विद्यार्थी संख्या 52257, प्रत्यक्ष परीक्षा दिलेली विद्यार्थी संख्या 50557.
11.गैरहजर विद्यार्थी संख्या 1700.
एकूण उपस्थिती प्रमाण 97 टक्के.
अशा प्रकारची माहिती मा.गजानन पळसे प्र. संचालक (परीक्षा व मूल्यमापन मंडळ) यांनी दिली आहे.
मा. कुलगुरू डॉ.डी.टी. शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली व परीक्षा नियंत्रक मा. गजानन पळसे यांच्या उत्तम नेतृत्वाखाली विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने उच्च कोटीची कामगिरी केली आहे. या उत्तम कामगिरीबद्दल विद्यापीठाशी संबंधित सर्व घटकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा