मालोजीराव माने : कार्यकारी संपादक
जयसिंगपुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा.दत्तात्रय बोरिगिड्डे यांची बदली झाली असल्याने तसेच पोलीस निरीक्षक मा.राजेंद्र मस्के यांची जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये बदली झाल्याने या दोघांच्या सन्मानार्थ पोलीस ठाण्याच्या वतीने सदिच्छा व स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला.
सुरुवातीस या सोहळ्यात संपादक प्रा.डॉ.प्रभाकर माने यांनी उपस्थित मान्यवरांचे पोलीस ठाण्याच्या वतीने यथोचित स्वागत करण्यात आले. तसेच प्रास्ताविकात ते म्हणाले की, कायदा व सुव्यवस्था जपणारे व सामाजिक संवेदनशील असणारे पोलीस निरीक्षक मा.दत्तात्रय बोरिगिड्डे यांची शिरोळ पोलीस ठाण्यात बदली झाली झाल्याने त्यांच्या कार्याला उजाळा देणे तसेच डॅशिंग व्यक्तिमत्व असणारे पोलीस निरीक्षक मा.राजेंद्र मस्के यांची जयसिंगपूर पोलीस ठाण्यामध्ये नव्याने बदली होऊन पदभार स्वीकारत असताना त्यांचा सन्मान व्हावा हा येतो आहे.
यानंतर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी मा.पटेल(ASI) यांच्या वतीने व सर्व पोलिस कर्मचारी यांच्या हस्ते मा. दत्तात्रय बोरीगिड्डे यांचा सत्कार करून त्यांना सदिच्छा देण्यात आला. तसेच नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक मा.राजेंद्र मस्के यांचे मनस्वी स्वागत करण्यात आले.
पोलीस ठाण्याच्या वतीने मनोगत व्यक्त करताना मा.पटेल म्हणाले, बोरिगिड्डे साहेबांनी एका कुटुंब प्रमुखा प्रमाणे पोलीस ठाण्याच्या कारभार सांभाळला. कुटुंबातील आमच्यासारख्या सर्व सदस्यांना अगदी हक्काची व सन्मानाची वागणूक दिली. त्यामुळे आम्ही सर्वजण आमचं कर्तव्य उत्तम पद्धतीने पार पाडू शकलो. तसेच नवनियुक्त मस्के साहेबांचे स्वागत करून दोघांचाही पुढील वाटचालीस व कार्यास त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर कॉन्स्टेबल यांनी दोन वर्षातील कार्याचा मागोवा घेत महापूर व कोरोना काळातील कार्याचा उल्लेख केला.
प्रा.सुनील चौगुले यांनी बोरीगिड्डे साहेबांच्या आयुष्याचा खडतर जीवन प्रवास थोडक्यात मांडूळ उपस्थितांच्या मध्ये एक भावनिक वातावरण निर्माण केले. नगरसेवक पराग पाटील यांनी त्यांच्या कार्याला स्पर्श करीत आपले विचार मांडले. सरतेशेवटी पत्रकार बंधूंच्या वतीने पत्रकार संतोष बामणे यांनी बोरीगिड्डे यांच्या उत्कृष्ट कार्याचा उल्लेख करीत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या सदिच्छा व स्वागत सोहळ्यात बोलताना मा.बोरीगिड्डे साहेब भावुक झाले होते. जयसिंगपूर पोलीस ठाण्यात रूजू झाल्यापासून ते सदिच्छा समारंभ पर्यंत मी माझ्या सहकाऱ्यांच्या मुळे दोन आरोपींना सहा वर्ष सक्तमजुरीची शिक्षा, छोट्या- मोठ्या चोर्याचा छडा लावण्याचे काम केलं. जयसिंगपूर पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या गावात कायदा सुव्यवस्था जपण्याचं काम केलं. तसेच कोरोना व महामारीमध्ये केलेले सर्व काम सहकाऱ्यांच्या मुळेच साध्य झालं. तसेच या गावातील प्रतिष्ठित नागरिक,सामाजिक संस्था व मित्रांच्या सहकार्यामुळे माझ्या हातून उत्तम कार्य घडू शकलं.
यानंतर नवनियुक्त पोलीस निरीक्षक मा.मस्के साहेब यांनी यापूर्वी नियुक्त असलेल्या ठिकाणांची माहिती दिली.जयसिंगपूर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून जे काही उत्तम करता येईल ते करण्याचा प्रयत्न करेन तसेच पोलिस ठाण्यातील सर्व कर्मचाऱ्यांच्या बरोबर सलोख्याचे व विश्वासपूर्ण ऋणानुबंध निर्माण करण्याचा प्रयत्न करेन अशा प्रकारची ग्वाही त्यांनी दिली.
सदर कार्यक्रमास जयसिंगपूर शहरातील मान्यवर पत्रकार बंधू, प्रतिष्ठित नागरिक,पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमास आभार मा.पटेल यांनी तसेच उत्तम सूत्रसंचालन प्रा.सुनील चौगुले यांनी केले.
याप्रसंगी उपस्थित असणाऱ्या सर्व घटकांचे डोळे पाण्याने डबडबले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा