![]() |
अमृता कारंडे Photo source - Facebook |
कोल्हापुरातील KIT केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागामध्ये शिकणाऱ्या अमृता विजयकुमार कारंडे या विद्यार्थिनीची जगप्रसिद्ध अॅबोड कंपनीमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून निवड झाली आहे. आणि यात तिला तब्बल ४१ लाखांचे पॅकेज मिळाले आहे.
अमृता ही सर्वसामान्य कुटुंबातून आहे व तिचे वडील विजयकुमार हे रिक्षाचालक आहेत. भविष्यात आपल्या देशाच्या आयटी व संगणकशास्त्र क्षेत्रामध्ये नवनिर्मितीचे भरीव योगदान देण्याचे अमृताचे स्वप्न आहे.
तृतीय वर्षात शिक्षण घेत असताना अॅडोब कंपनीने ‘C कोडिंग’ स्पर्धा घेतली होती.यामधे अमृताची अडीच महिन्यांच्या इंटर्नशिपसाठी निवड झाली. त्याकरिता तिला मासिक १ लाखाची शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिच्या मेहनतीने तिने हे यश संपादन केले आहे. तिला मिळालेल्या यशाबद्दल कोल्हापूर आणि परिसरात अमृताचे कौतुक होत आहे.
कंपनीची खास प्री-प्लेसमेंटची ऑफर
इंटर्नशिपदरम्यान घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमधून तिने मिळवलेली गुणवत्ता प्रमाणभूत धरून कंपनीने तिला ही खास प्री-प्लेसमेंटची ऑफर दिली. या प्लेसमेंटला देशपातळीवर मानाचे स्थान आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा