✍🏼 योगेश घाडेकर - प्रमुख प्रतिनिधी
सध्या सोशल मीडियावर भलताच ट्रेंड सुरू आहे. जसे की "डी मार्ट च्या वर्धापन दिनानिमित्त फ्री गिफ्ट मिळवा", "अमेझॉन चा सेल वर मिळवा फ्री मोबाईल", "जियो देत आहे फ्री रिचार्ज" इत्यादी.
व्हॉट्सअँप वर येणाऱ्या बनावट लिंक |
नुकतेच डी मार्ट च्या २०व्या वर्धापन दिनानिमित्त मिळवा फ्री गिफ्ट" अशी लिंक व्हायरल झाली होती. नंतर डी मार्ट कडून तसेच सायबर कार्यालयाकडून असे स्पष्ट करण्यात आले की ती लिंक बनावट होती आणि त्याद्वारे कितीतरी जणांची आर्थिक फसवणूक झाली आहे.
प्रथम समजून घेऊया की अशा खोट्या फसव्या बनावट वेबसाइट का निर्माण केल्या जातात ?
त्यांचा उद्देश एकदम सोपा आणि साधा सरळ असतो, एखाद्या युजर ची वैयक्तिक माहिती - डेटा चोरणे , आर्थिक फसवणूक तसेच फ्री मध्ये आपली जाहिरात करण्यासाठी अशा खोट्या बनावट वेबसाइट बनविल्या जातात व पसरवल्या जातात.
तर मग अशा बनावट लिंक पासून आपला बचाव करावा तरी कसा?
थोड्याशा टेक्निकल माहिती चे ज्ञान असण्याने अशा फसव्या म्हणजेच फिशिंग वेबसाईट पासून आपण आपला बचाव करू शकतो व आपली माहिती व पैसा वाचवू शकतो.
*त्यासाठी काही टिप्स-*
1. प्रथम ती लिंक वेबसाईट अधिकृत आहे की नाही हे पाहावे जसे की त्यांच्या नावांमध्ये थोडासा फेरफार करून बनवले आहे का? स्पेलिंग मिस्टेक आहे का? उदा. "https://www.dmart.in/"
ही डी-मार्ट ची अधिकृत वेबसाईट आहे, व खालील पसरवल्या जाणाऱ्या वेबसाईट खोट्या आहेत -
https://coherentyoung.top/dmart/tb.php?_t=16294492891629449432541
https://www.dmartindia.com
2. गुगल सेफ ब्राउझिंग
https://www.google.com/transparencyreport/safebrowsing/diagnostic/?
या वेबसाईटवर आपण ती वेबसाईट Encrypted आहे की नाही, सेफ आहे की नाही हे पडताळून पाहु शकतो.
3. बनावट वेबसाइटचे लिंक ओपन केल्यानंतर कोणत्यातरी भलत्याच वेबसाईट ब्राउजर मध्ये लोड होताना दिसतात. अर्थात त्या बनावट आहेत हे त्यावेळी सिद्ध होतं.
4. बनावट वेबसाईट वर इमेजेस या कमी रेझोल्यूशनच्या थोड्या ब्लर दिसणाऱ्या असतात. होम पेज आकर्षक अधिकृत वाटावं असं दिसत नाही.
5. बहुतेक बनावट वेबसाईट या सोप्या प्रश्नावली विचारून वापरकर्त्याला किंवा युजरला बक्षीस जिंकल्याचे आमिष दाखवतात, त्यावेळी त्या वेबसाईटवर / संकेत स्थळावर प्रश्नावली चा भाग सोडून इतर कोणत्याही ठिकाणी आपण क्लिक टच करू शकत नाही किंवा केले तरी काही ओपन होत नाही.
6. बनावट संकेतस्थळ किंवा वेबसाईट वर शेवटी दिसणारे रिव्ह्यूज कमेंट्स या प्रत्येकाला सारख्या आणि त्याच दिसत असतात.
7. अशा प्रकारच्या वेबसाईटवर आपण एखादं बक्षीस जिंकल्यानंतर वेबसाइटच्या कस्टमर केअर / ग्राहक सेवा केंद्र किंवा फीडबॅक वर जाऊन आपण संपर्क करून खातरजमा करून घ्यावी.
फसवणूक झाल्यास तात्काळ आपल्या जवळच्या सायबर सेल पोलीस शाखेशी संपर्क करून तक्रार नोंदवा व इतरांनाही या पासून सावधान करा.
अशाप्रकारे आपण काही जुजबी माहितीनुसार अशा बनावट वेबसाईट पासून आपली आणि आपल्या कुटुंबाची वैयक्तिक आर्थिक फसवणूक टाळू शकतो.
🙏🏼 सावध रहा सुरक्षित रहा 🙏🏼
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा