Breaking

रविवार, २२ ऑगस्ट, २०२१

रुकडी कॉलेजचे बहुआयामी व्यक्तिमत्व प्राचार्य डाॕ.अर्जुन राजगे काळाच्या पडद्याआड


प्राचार्य डॉ.अर्जुन राजगे


प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी


रुकडी :  येथील बाळासाहेब माने एज्युकेशन ट्रस्ट संचलित राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालयाचे कार्यशील प्राचार्य डाॕ.अर्जुन राजगे यांचे रविवार दि.२२-८-२०२१ रोजी दुःखद निधन झाले.  मुळ गाव शेवरी ता.माण जि.सातारा हे असून डाॕ.राजगे १९९७ पासून रुकडी येथे प्राचार्य म्हणून कार्यरत होते. २०१० ते २०१५ या   कालावधीत विद्यापीठ व महाविद्यालये विकास मंडळाचे संचालक म्हणून शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर तिचे सर्वोच्च सेवा बजावली आहे.    

      विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर देखील त्यांनी उत्तम कार्य केले होते. एक अभ्यासू ,सर्व समावेशक व्यक्त्तीमत्व आणि प्रशासनावर अभ्यासपूर्ण पकड असणारे प्राचार्य डाॕ.अर्जुन राजगे यांच्या आकस्मिक जाण्याने शैक्षणिक क्षेत्रात भरुन न येणारी पोकळी निर्माण झाली आहे. 

      प्राचार्य डाॕ.अर्जुन राजगे यांच्या आकस्मिक निधनामुळे विद्यार्थी,शिक्षक व प्रशासकीय कर्मचारी हळहळ व्यक्त्त करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा