![]() |
संग्रहित |
योगेश घाडेकर - प्रमुख प्रतिनिधी
सध्या देशात 5G नेटवर्क ची टेस्टिंग सुरू झाली, आणि त्याबरोबरच मार्केटमध्ये 5G सपोर्ट चे मोबाईल येवू लागले आहेत. ज्याची किंमत फक्त 5G या एकाच फीचर साठी वाढवून लावली आहे. मग नवीन मोबाईल घेणाऱ्यांना कॅमेरा, बॅटरी बॅकअप, प्रोसेसर सोबतच मोबाईल 5G घ्यावा की 4G घ्यावा असा प्रश्न पडतोच. चला तर या प्रश्नाचं निरसन करू.
जाणकारांच्या माहितीनुसार भारतामध्ये सध्या तरी 5G ही टेक्नॉलॉजी लॉन्च झालेली नाहीये. आणि ती कधी लॉन्च होईल याची पक्की तारीख देखील नाहीये.5G येण्यासाठी अजुन किमान 1 ते 2 वर्ष लागतील असा अंदाज आहे.
5g नेटवर्क आल्यानंतर सध्याचे सर्व नेटवर्क बंद होतील का ?
5G नेटवर्क आल्यानंतरही 2G, 3G, 4G हे सर्व नेटवर्क 5G सोबत चालू राहतील. त्यामुळे जुने मोबाईल भंगारात काढण्याची वेळ येणार नाहीये.
सर्वात महत्त्वाचं आपल्याला हे समजून घ्यायला हवं की, तुमचा स्मार्टफोन फक्त 5G असून चालणार नाही तर 5G च्या खाली असणारे किती 5G बँडस् तो मोबाईल सपोर्ट करू शकतो हे पाहिलं पाहिजे. सध्या 4G मोबाईलमध्ये 3.5GHz ते 4.5GHz बँड्स रन होतात. त्यामुळे 4.5GHz व त्यापेक्षा जास्त बँड्स हे 5G साठी उत्तम समजले जाते.
![]() |
Photo source - Qualcomm |
टेलिकॉम रेग्युलेटरी अथोरिटी ऑफ इंडिया (TRAI) या भारत सरकार च्या अधिकृत नियमनाने काही दिवसापूर्वी 5G नेटवर्कची टेस्टिंग सुरू करण्यास परवानगी दिली आहे. पण 5G नेटवर्कच्या सर्व स्पेक्ट्रमचा - बँड चा लिलाव पूर्ण केलेला नाही आहे याचा अर्थ भारतात किती स्पेक्ट्रम / बँड्स चे नेटवर्क येईल हे सांगता येणार नाहीये.
त्यामुळे सध्या 5G मोबाईल घेणारच असाल तर कमीत कमी 5 ते 7 बँड्स पेक्षा जास्त बँड्स असलेले मोबाईल घेतलेले बरे , जे की सद्या थोडे महाग आहेत. परंतु ज्या गोष्टीचा सध्या आपल्याला उपयोग होणारच नाहीये, आणि पुढे किमान एक ते दोन वर्ष उपयोग होणार नाहीये, त्या गोष्टीला आता खर्च करण्यात हुशारी नाहीये.
पुढच्या काही दिवसातच जसजसे 5G नेटवर्क अस्तित्वात येईल तसा सध्यापेक्षा अधिक दर्जेदार फीचर्स असलेले आणि अगदी कमी किमतीत उत्तम मोबाईल उपलब्ध होतील. त्यामुळे भविष्यात उपयोगी पडेल म्हणून आता खर्च करण्यापेक्षा 5G मोबाईल घेण्याची घाई न केलेलीच बरी. व 5G नेटवर्क लॉन्च झाल्यावर अधिक चांगले मोबाईल हँडसेट येण्याची वाट पाहावी.
बाकी निर्णय तुमचा आहे.
जय हिंद!
Right
उत्तर द्याहटवा����Nice Information Thanks Bhai
उत्तर द्याहटवा