प्रा.मेहबूब मुजावर : विशेष प्रतिनिधी
शिरोळ : माळवाडी बोरगाव सोलापूर येथे मातंग समाजातील प्रेत स्मशानभूमीत जाळण्यास जातीयवादी गावगुंडानी नकार दिला त्याचा निषेध व विरोधात शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेच्या वतीने शिरोळ तहसील कार्यालय नायब तहसीलदार मा.संजय काटकर यांना निवेदन देण्यात आले.
अधिक माहिती अशी की,मयत धनंजय साठे हे माळवाडी बोरगाव ता. माळशिरस जि.सोलापूर असून त्यांचे बंधू हे त्या गावचे सरपंच पदावर जातीवादी गावगुंडांची हा मनात राग धरून साठे यांचे प्रेत स्मशानभूमीत जाण्यास नकार दिला व मातंग समाजाला शिवीगाळ मारहाण करण्यात आलीत्या स्थितीमध्ये पोलीस प्रशासनही तिथेच उभी असून देखील त्या गावगुंडांना साथ दिली सदर जातीवादी गावगुंडांचा व पोलीस यांचा जाहीर निषेध करण्यात आला तात्काळ संबंधित गुन्हेगार वृत्तीच्या जातीयवादी समाजकंटकांवर व संबंधित पोलिस अधिकारी यांच्यावर ही गुन्हे दाखल व्हावेत.तसेच सात दिवसात कार्यवाही न झाल्यास बोंब ठोक आंदोलनाचा इशारा देण्यात आला असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
शिरोळ तालुका मातंग समाज संघटनेचे अध्यक्ष अरुण कांबळे,सचिव शशिकांत घाटगे, कार्याध्यक्ष खंडू भोरे, उपाध्यक्ष उमेश आवळे,सहसचिव संदीप बिरणगे, सल्लागार उदय मिसाळ सर ,बाबुराव आवळे,श्रीपती सावंत सर, विजय गायकवाड, युवराज गायकवाड, अरुण भंडारे,नितीन वायदंडे व समस्त मातंग समाज बांधव उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा