Breaking

रविवार, ८ ऑगस्ट, २०२१

शिक्षकांसाठी खुशखबर! ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांचे दिले आश्वासन


     राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यातील जिल्हा परिषद शाळातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या दिवाळीत करण्याचे आश्वासन  शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिले. संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुंबई  येथे मुश्रीफ यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी आश्वासन दिले.

     कोरोना संसर्गामुळे  मागील दोन वर्षापासून प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नाहीत. हजारो शिक्षक बदलीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे यावर्षी बदल्या कराव्यात. एका शाळेत तीन वर्ष सेवा पूर्ण झालेला शिक्षक बदलीस पात्र ठरावा अशी या मागणी शिष्टमंडळाने केली आहे. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी शिक्षकांच्या बदली सॉफ्टवेअरमध्ये असणाऱ्या काही त्रुटी दुरुस्त झाल्यावर येत्या दिवाळीत बदल्या करू. याशिवाय सामान्य प्रशासन विभागाची विशेष मान्यता घेऊन शिक्षकांच्या प्रथम आंतरजिल्हा बदल्या आणि त्यानंतर जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया पार पाडू असे आश्वासन दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा