Breaking

शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

🌸 लोटस मेडिकल फौंडेशन, कोल्हापूर अंतर्गत स्पंदन कार्यक्रम पार पडला: प्रमुख वक्ते अभिनेते श्री. राहुल बोस यांनी मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले.



      लोटस मेडिकल फौंडेशन, कोल्हापूर अंतर्गत संस्थेमधील मुलांकरिता घेण्यात येणारा 'स्पंदन कार्यक्रम', आज शनिवार दिनांक ७ ऑगस्ट २०२१ रोजी, दुपारी. ३ ते ४.३० यावेळेत ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आला.सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते आणि भारतीय रग्बी टीमचे पूर्व कर्णधार 'श्री. राहुल बोस' यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. ज्यामध्ये राहुल बोस यांचा हिंदी, बंगाली, इंग्रजी व तमिळ चित्रपटांमधील त्यांचा प्रवास, भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर रग्बी हा खेळ खेळत असतानाचे त्यांचे अनुभव, सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यासाठी त्यांनी स्थापन केलेल्या "दि फौंडेशन" आणि "हिल संस्था" यांच्या मार्फत त्यांनी केलेले सामाजिक कार्य. तसेच या सर्व गोष्टी साध्य करत असताना त्यांनी अनुभवलेले चांगले आणि वाईट अनुभव त्यांनी या कार्यक्रमा प्रसंगी मुलांसोबत व्यक्त केले.

      मुलांना उदभोदित करताना ते म्हणाले की, 'आपण जर आपल्या स्वतः वर विश्वास ठेवला तर आपण कोणत्याही अडचणींवर मात करू शकतो.' 'जर एखादा व्यक्ती आपल्या मार्गात अडथळा निर्माण करत असेल तर आपल्याला त्या परिस्थितीसोबत झगडुन नवीन मार्ग शोधला पाहिजे व आपल्याध्ये आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे.' तसेच ते पुढे म्हणाले की 'जर आपल्याला आयुष्यात कधीही निराश व उदास वाटत असेल तर "हास्य आणि व्यायाम" या दोन गोष्टीचं मूलमंत्र लक्षात ठेवला पाहिजे.' हसण्याने व व्यायामाने आपल्यामध्ये सकारात्मकता निर्माण होण्यास मदत मिळते व आपला मूड बदलण्यास मदत मिळते. असे ते म्हणाले.



      कार्यक्रमा दरम्यान राहुल बोस यांनी मुलांसोबत देखील सुसंवाद साधला व त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.

     प्रस्तुत कार्यक्रमा प्रसंगी संस्थेच्या अध्यक्ष. सौ. उषा थोरात, व्यवस्थापकीय विश्वस्त. डॉ. किमया शहा, संस्थेचे विश्वस्त. श्री. सुनील गुंडाळे आणि संस्थेतील सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा