देशभरात कोरोनाचा संसर्ग (Covid 19) पुन्हा एकदा वाढू लागला असताना कोरोनाबाधितांच्या रुग्णवाढीचा वेगही वाढला आहे. देशातील 10 राज्यांत कोरोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढू लागली असल्याचे निरिक्षण तज्ञांकडून नोंदविण्यात आले आहे. मागील काही आठवड्यांमध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हीचा दर (Positivity Rate) असणाऱ्या जिल्ह्यात पुन्हा एकदा कडक निर्बंध लावण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. देशामधील किमान 46 जिल्ह्यांचा पॉझिटिव्हीटी दर तब्बल 10 टक्क्यांपेक्षा जास्त असून 53 जिल्ह्यांचा कोरोना पॉझिटिव्हीटी दर हा 5 ते 10 टक्क्यांच्या जवळपास आहे. या पाश्वभूमीवर केंद्र सरकारने कोरोना बाधितांचं निदान तात्काळ होण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
सध्यस्थितीत पुन्हा एकदा हालगर्जीपणा केल्यास देशातील या जिल्ह्यांमध्ये आणखी परिस्थीती ढासळत जाईल, असा इशाराही केंद्रीय मंत्रायलयाकडून देण्यात आला आहे. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, ओडिशा, आसाम, मिझोराम, मेघालय, आंध्रप्रदेश आणि मणिपूर या राज्यांतील परिस्थितीचा कोरोनाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. वरील राज्यांमधील आरोग्य विभागाकडून कोरोनाचं सर्वेक्षण आणि आणि व्यवस्थापनासाठी राबविण्यात आलेल्या उपाययोजनांचाही आढावा या बैठकित घेण्यात आला. दैनंदिन रुग्णसंख्या या राज्यांमध्ये वाढत आहे.
या पाश्वभूमीवर मागील काही आठवड्यांमध्ये 10 टक्क्यांपेक्षा जास्त कोरोना पॉझिटीव्हीटी रेट असणाऱ्या जिल्ह्यांनी पुन्हा एकदा नागरिकांच्या गर्दीवर, देशांतर्गत प्रवासावर रोख लावण्यात यावी जेणेकरुन कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी मदत होईल, असं आरोग्य मंत्रालयाने आपल्या पत्रकामध्ये म्हटलं आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा