Breaking

सोमवार, २ ऑगस्ट, २०२१

चक दे इंडिया ! ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास

 


💫भारतीय हॉकी पुरुष संघाने तब्बल ४९ वर्षांनी सेमी फायनल मधे प्रवेश मिळवला आहे.

💫तर भारतीय महिला हॉकी संघाने इतिहासात प्रथमच सेमी फायनल मधे प्रवेश मिळवला आहे.


     टोकियो ऑलिम्पिकमध्ये  भारतीय महिला हॉकी संघाने इतिहास रचला आहे. भारताच्या महिला संघाने  बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन उपांत्यफेरी अर्थात सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे.इतिहासात पहिल्यांदाच महिला हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीत(सेमी फायनल) मधे प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत भारतीय संघाने मोठे उलटफेर करत, ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत केलं. दिग्गज समजल्या जाणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला हॉकी संघावर भारतीय महिला संघाने 1-0 असा विजय मिळवला. भारताकडून गुरजीत कौरने  गोल डागला.




भारतीय पुरूष हॉकी संघाने उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनचा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताने ब्रिटनला ३-१ ने पराभूत केलं. भारतीय संघ सुवर्णपदकापासून दोन विजय दूर आहे. जवळपास ४ दशकानंतर भारतीय पुरूष हॉकी संघ उपांत्य फेरीत पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाकडून १-७ ने पराभवाचं तोंड पाहिल्यानंतर भारतीय संघाने जोरदार पुनरागमन केलं. ‘अ’ गटातील ५ पैकी ४ सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली होती. आता उपांत्यपूर्व फेरीत ग्रेट ब्रिटनला पराभूत करत उपांत्य फेरीत स्थान मिळवलं आहे. उपांत्य फेरीत भारताचा सामना बेल्जियमशी होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा