प्रविणकुमार माने :उपसंपादक
जयसिंगपूर ता.शिरोळ जि कोल्हापूर येथे पोलिसांनी महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियमांतर्गत एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल करून मोठी कारवाई केलेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जयसिंगपूर येथील जयसिंगनगर झोपडपट्टीत एकूण सहा आरोपी हे सध्या कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याची माहिती असताना तसेच महाराष्ट्र शासनाने राज्यात लाॅकडाउन बाबत नियम व आदेश जारी केला असताना सदर 6 आरोपीनी कोरोना नियमांचे व शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करीत एकूण सहा आरोपी हे एकत्रित गोलाकार बसून पत्त्यांचे तीन पाने खेळावर पैसे लावून जुगारांचा बेकायदेशीर व बेभरवशाचा खेळ खेळत असताना तारीख 1/08/2021 रोजी दुपारी 15.30 वाजता भाजी मंडई ,जयसिंगनगर येथे पोलिसांना मिळून आले.1)सतिश मधुकर माने रा.जयसिंगनगर ,2)आकाश सुरेश अर्जून रा.जयसिंगनगर 3)चाँद शोकत विजापूरे रा.जयसिंगनगर 4)रवि बाबुराव मनकटे रा.जयसिंगनगर 5)चंद्रकांत रामापा कांबळे रा.संभाजीनगर व 6)सुनिल वसंत चाकरे रा.५२ झोपडपट्टी अशी संशयित आरोपींची नावे आहेत.
सदर आरोपींचे विरूदध आय.पी.सी.,महाराष्ट्र जुगार बंदी अधिनियम आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये वापरलेल्या पत्यांसहीत एकूण ₹ २२२०/- चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर प्रकरणी मा.अमोल चंद्रकांत अवघडे यांनी फिर्याद दिली आहे. शहरात अशा प्रकारची धडक व कडक कारवाईचे सत्र सुरू आहे. जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनानुसार ही कारवाई सुरू केलेली आहे. जयसिंगपूर पोलिसांच्या या उचित कारवाईने नागरिकांकडून जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा