Breaking

बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

*जयसिंगपुर साप्ताहिक नगरीच्या वतीने डॉ.पाखरे,डॉ.खटावकर व दत्तात्रय बोरिगिड्डे व अन्य घटक कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित

 



रोहित जाधव : शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी


जयसिंगपूर : साप्ताहिक जयसिंगपूर नगरी व जयसिंगपुर नगरी न्यूज चॅनलच्या वतीने १५ ऑगस्ट स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी दिनी कोरोना महामारीच्या काळात कोरोना महामारीला अटकाव व जनजागृतीकामी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल या सर्वांचा सन्मान करण्यात आला. 

  आपले गाव कोरोनामुक्त गांव  करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या डॉक्टर,सर्व आरोग्य विभागातील कर्मचारी व शासकीय कर्मचाऱ्यांचा कोरोनामुक्त जयसिंगपूर नगरीच्या वतीने कोरोना योद्धा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला.

     शासनाचे नियमांचे पालन करून कोरोना महामारीमध्ये प्रत्येक नागरिकांना लसीकरण करून गाव कोरोना मुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.पांडुरंग पाखरे व जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर व त्यांचे सर्व सहकारी कर्मचारी वर्ग,दानोळीचे प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ.गायत्री नांद्रेकर, जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे, संभाजीपूर ग्रामपंचायत ग्रामसेवक प्रकाश कोळेकर, मौजे आगर ग्रामपंचायतीचे सरपंच अमोल चव्हाण, चिपरी येथील शाहू विद्यामंदिरचे प्रभारी मुख्याध्यापक अनिल खिलारे या सर्वांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. 

      महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व श्री दत्त शेतकरी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आपल्या विभागाचे खासदार धैर्यशील माने व माजी आमदार उल्हास पाटील, माधवराव घाटगे, इचलकरंजी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड,शिरोळ तहसीलदार डॉ.अपर्णा मोरे-धुमाळ, जयसिंगपूर विभागाचे डीवायएसपी रामेश्वर वैंजणे, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा डॉ.नीता माने,उपनगराध्यक्ष संजय पाटील- यड्रावकर, जयसिंगपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी टिना गवळी, जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेविका स्वरूपा पाटील-यड्रावकर, जिल्हा परिषद सदस्य स्वाती सासणे, उद्योगपती संजय घोडावत, विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके, उद्योगपती विनोद भाऊ घोडावत त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, सभापती, ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक सदस्य, डॉक्टर, विविध मंडळांचे पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.

   यावेळी जयसिंगपूर नगरीचे संपादक मा.राजू सय्यद यांच्या उदात्त भावना, सामाजिक बांधिलकी व सुनियोजनाने हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा