Breaking

मंगळवार, १७ ऑगस्ट, २०२१

तालिबानने कब्जा केलेल्या अफगाणिस्तानमधील क्रिकेट संघाचे काय होणार ? अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने भूमिका मांडली.



अफगाणिस्तान : अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेलं राजकीय संकट आणि अस्थिरतेमुळे अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या भवितव्याबद्दलही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आगामी टी -20 विश्वचषकात संघाच्या सहभागाबाबतही शंका आहे. मात्र, या संपूर्ण परिस्थितीवर अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने (एसीबी) आपली भूमिका मांडली आहे. 


एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे मीडिया मॅनेजर हिकमत हसन यांनी सांगितलं, 'आमचा संघ टी -20 वर्ल्ड कप खेळणार याबद्दल कोणतीही शंका नाही. टी-20 वर्ल्ड कपच्या तयारीसाठी आमचा संघ लवकरच ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजबरोबर तिरंगी मालिका खेळणार आहे.


हेही वाचा...

भारत - पाक संबंधाबाबत तालिबानची भूमिका काय ?


राशीद आणि नबी आयपीएलमध्येही खेळणार?

यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात राशीद खान आणि मोहम्मद नबी खेळताना दिसून येतील. सनरायझर्स हैदराबादचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. शण्मुगम यांनी उर्वरित स्पर्धेत हे दोन खेळाडू उपलब्ध असतील अशी माहिती दिली आहे. राशिद खान सध्या इंग्लंडमध्ये असून तो 'द हंड्रेडमध्ये ट्रेंट रॉकेट्स'कडून खेळत आहे. राशिद खानने या कठीण परिस्थितीत अफगाणिस्तानला एकटं सोडू नये, असं आवाहन जागतिक नेत्यांना केलं होतं. 


मात्र, आंतरराष्ट्रीय अभ्यासकांकडून कट्टरता वादी तालिबानच्या ताब्यातील अफगाणिस्तान बाबत सध्या क्रिकेटच नव्हे तर  इतर कोणत्याच गोष्टीबाबत काहीही सांगता येत नसल्याचं मत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा