मिरज : मिरज शहर सातत्याने कोणत्या ना कोणत्या प्रकरणाने प्रकाश झोतात येत असते.अशीच एक दुर्दैवी घटना मिरज शहरात घडली असून सर्वत्र खळबळ माजली आहे. घटनेची मिळालेली माहिती अशी आहे की,एका 20 वर्षीय नर्सने विषारी इंजेक्शन (Toxic Injection) घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सांगली जिल्ह्यातील मिरज या ठिकाणी घडली आहे. नर्सने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही घटना 10 ऑगस्ट (मंगळवारी) घडली. आम्रपाली सतीश कांबळे (वय, 20 रा. रमामाता आंबेडकर कॉलनी, ता. मिरज) असं आत्महत्या केलेल्या नर्सचे नाव आहे. पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोट आढळली आहे.
मात्र आत्महत्येचं (Suicide) कारण अद्याप अस्पष्ट आहे.याबाबत माहिती अशी की, मृत आम्रपाली कांबळे हिचे गेल्या काही दिवसांपासून आपल्या ओळखीच्या एका तरुणासोबत प्रेमसंबंध (Love Affair) सुरू होते.याची माहिती आम्रपालीच्या कुटुंबीयांना मिळाली होती.परंतु, कुटुंबीयांनी दोघांच्या लग्नाला होकार दिला होता.असं असून देखील आम्रपालीने मंगळवारी विषारी इंजेक्शन (Toxic Injection) घेत आत्महत्या केली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आम्रपाली ही एका खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होती.आम्रपालीनं विषारी इंजेक्शन घेतल्याची माहिती कुटुंबीयांना कळल्यानंतर, नातेवाईकांनी तात्काळ तिला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलवलं.
परंतु, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
या दरम्यान, आम्रपाली हिने आत्महत्या का केली याचा अधिकृत कारणाचा खुलासा पोलिसांकडून अद्याप करण्यात आला नाही.
दरम्यान, पोलिसांना घटनास्थळी सुसाइड नोट (Suicide note) मिळाली आहे.यामधून आत्महत्येचं नेमक्या कारणाचा खुलासा होण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा