Breaking

गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१

*मोमीन मोहल्ला ग्रुप,कुरुंदवाडच्या वतीने संवेदनशील पत्रकार रोहित जाधव यांचा सन्मान*

 


सौंदर्या पोवार : विशेष प्रतिनिधी


     शिरोळ तालुक्यात पावसाने थैमान घातले आणि पुरस्थिती निर्माण झाली.सर्वत्र घरे पाण्याखाली गेली,लोकांचे अतोनात नुकसान झाले,शेती पाण्यात गेली पिकाचे नुकसान झाले,त्यात काम धंदा नाही,पोटा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला होता,ही बाब लक्षात घेऊन जयसिंगपूरचे पत्रकार रोहित जाधव यांनी शिरोळ आणि कुरुंदवाडमधील पूरग्रस्तांना रोज जेवणाची सोय व मदत केली. या कार्याची दखल घेऊन कुरुंदवाडमधील मोमीन मोहल्ला ग्रुप,कुरुंदवाडच्या वतीने संवेदनशील पत्रकार रोहित जाधव यांचा सन्मान पत्र देवून गौरव करण्यात आला.रोहित जाधव यांच्या सामाजिक कार्याबद्दल शिरोळ तालुक्यातून कौतुक होत आहे.

       या सत्कार प्रसंगी विकेश रामदास डवरी,आयाज दस्तगिर फकिर, सादिक नुरमहंमंद गरगरे,आसिफ अत्तर सारवान,रामदास डवरी तसेच मोमीन मोहल्ला ग्रुप चे सर्व कार्यकर्ते आणि कुरुंदवाड मधील नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा