Breaking

शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

*कुंभोज येथे एकावर गुन्हा दाखल*

 


*प्रविणकुमार माने : उपसंपादक*


        कुंभोज ता.शिरोळ जि.कोल्हापूर येथे एकावर जयसिंगपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कवठेसार ता.शिरोळ येथील अजित नरंदेकर यांचे राहते घरासमोर,रोडवर दि.29/07/2021 रोजी 8.30 वाजणेच्या सुमारास संशयित आरोपी सुनिल निलकंठ गणबावले याने त्याच्या मालकीचा ट्रॅक्टर हेड क्र.MH.09.D5181 या ट्रॅक्टरच्या पाठीमागे जोडलेल्या पाण्याच्या टँकरला निष्काळजीपणे सदोष विद्युत जोडणी करून, जोडलेल्या इलेक्ट्रीक मोटारीला कवठेसार या गावातील अजित बापू नरंदेकर यांचे घरातून निष्काळजीपणे विद्युत पुरवठा करून टँकरमधील पाणी विकत असताना निष्काळजीपणा करून टँकरला सदोषपणे जोडलेल्या इलेक्ट्रीक मोटारीतून शाॅर्ट सर्कीट होवून त्या शाॅक सर्कीटमुळे मंगल दादासो फरांडे व.व.65 रा.राममंदिरजवळ,कवठेसार यांच्या मृत्यूस आरोपी सुनिल निलकंठ गणबावले हे कारणीभूत झालेची फिर्याद मयताचे पती श्री दादासो जिनापा फरांडे यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दिलेली आहे.सदर फिर्यादीच्या फिर्यादीवरून पोलीस.हे.काॅ.सावंत यांनी ता.11/08/2021 रोजी आरोपी सुनिल निलकंठ गणबावले याच्याविरुद्ध आय.पी.सी.कलम 304(अ)नुसार गुन्हा दाखल केलेला असून सदर प्रकरणाचा तपास सहा.फौजदार कोळीसाहेब करीत आहेत. 

       सदर प्रकरणातील ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. सदर दुर्देवी घटनेमुळे संपूर्ण कवठेसार गावात शोककळा पसरली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा