शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी- रोहित जाधव
शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती या गावात दुपारी ४.००च्या सुमारास एका महिलेच तुडुंब भरलेल्या विहिरीमध्ये पडून तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अलका सुभाष चौगुले वय वर्ष ५० असे दुर्दैवी मृत महिलेचे नाव असून ती शेतातील विहिरीवरील पाण्याची मोटार सुरु करणेस गेली असता तोल जाऊन पाय घसरल्याने विहिरीत पडली. दरम्यान तिला पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून तिचा अंत झाला. विहिरीवरील मोटार सुरू करून अजून पर्यंत परत आल्या नसल्याने तिचा सर्वत्र शोध घ्यायला सुरुवात केली व बुधवार दि.११ ऑगस्ट रोजी सकाळी स्थानिक लोकांनी सांगलीतील स्पेशल रेस्क्यू फोर्सला कॉल करुन तात्काळ बोलावले व धरणगुत्ती गावातील शेतातील विहिरीत पडलेला त्या महिलेचा मृत्यू देह बाहेर काढला. शिरोळ पोलीसांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे.पुढील तपास शिरोळ पोलिस करत आहेत.
याप्रसंगी रेस्क्यू फोर्सचे आशिष सावंत, कैलास वडर,चेतन माळी व विश्व सेवा फाउंडेशनचे मेंबर गणेश आवटी, योगेश आवटी, गजानन नरळे,आदींच्या प्रयत्नांनी मृतदेह बाहेर काढण्यात यश मिळाले.
या दुर्दैवी घटनेने धरणगुती गावात शोककळा पसरली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा