Breaking

रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

जयसिंगपूरातील शाळा नं. ३ मधील लसीकरण केंद्रावर मनमानी पद्धतीने लसीकरण ; सीनियर सिटीजनवर अन्याय

 


प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक


    जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्र व जयसिंगपूर नगरपरिषद यांच्या वतीने मोठ्या थाटामाटात मान्यवरांच्या हस्ते लसीकरण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. लोकांची सेवा करण्याची संधी या केंद्राच्या माध्यमातून मिळणार आहे अशा प्रकारची उदात्त चर्चा ही या ठिकाणी झाली.

      अवघ्या काही वेळेतच 45 वर्षे पूर्ण असलेल्या नागरिकांना पहिला डोस व 84 दिवस पूर्ण झालेल्यांना दुसरा डोस च्या लसीकरणाला सुरुवात होताच त्या केंद्रावर सीनियर सिटीजन यामध्ये महिलांचा सहभाग अधिक असून सर्वांना रांगेत व नियमाप्रमाणे लसीकरण मिळावे ही अपेक्षा होती. परंतु तेथील नगरपरिषदेचे कर्मचारी जाणीपूर्वक नागरिकास वेठिस धरणे. बाहेरून निरोप मिळताच अशा व्यक्तींना रांगेत न थांबता तातडीने लसीकरणाची सोय, अशा प्रकारचं कृत्य या केंद्रावर होताना दिसत होतं. या बाबत तेथील महिलांनी विरोध दर्शविला असता त्यांनाही न जुमानता हे काम या कर्मचाऱ्यांच्या कडून केले जात होतं.

       या केंद्रावरील वयोगट 45 च्या पुढील असल्यामुळे निश्चितच यामध्ये 65 पेक्षा अधिक वय असलेल्या महिला व पुरुष यांचे प्रमाण अधिक होते यामध्ये काही नागरिक शारीरिक दृष्ट्या सक्षम नसणे, पॅरालिसीस व इतर व्याधीं व वयानुसार शरीर साथ देत नसल्याने अशा नागरिकांना लसीकरण प्राधान्यक्रमाने देणे आवश्यक होतं. एरवही मतदानाच्या वेळेस ज्येष्ठ नागरिकांचा मतदान प्राधान्याने करून घेण्यासाठी लग्न घाई असते. मात्र लसीकरणाच्या वेळेस ज्येष्ठांचा आदर व प्राधान्याने लसीकरण  हे संस्कार कुठे जातात याची चर्चा मात्र नागरिकांच्या मध्ये आहे.


     लोकांच्या तक्रारी व मिळालेल्या माहितीनुसार मी स्वतः पत्रकार म्हणून तेथील केंद्राची पूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र राहुल नावाचा नगरपालिकेचा हा कर्मचारी कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद न देता जणू काही केंद्राचा तोच मालक असल्याच्या अविर्भावात वागत होता. त्याच्याकडून वरिष्ठ नागरिकांचा पदोपदी अपमान होत होता व त्याची वर्तणूक व बोलणं असभ्य होते.काही नागरिकाकडून आजारी व  सीनियर सिटीजनला प्राधान्य द्या अशा प्रकारचे विचार केला असता त्यांच्याशी तो असभ्यपणा बोलत होता. तसेच या ठिकाणी सोशल डिस्टंसिंग उडालेला फज्जा याविषयी कर्मचारी काम न करता खोली मध्ये बसून होते.    

    इतर वेळी वरिष्ठ नागरिक यांच्या मानसन्मानाची चर्चा होते मात्र लसीकरणाच्या वेळेस यांची माणुसकी  व संवेदनशीलता कुठे असते हे मात्र विचार करण्यासारखे आहे. आरोग्य केंद्राच्या वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व नगरपरिषदेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी यामध्ये हस्तक्षेप करून वरिष्ठ नागरिकांची जो अपमान व हेळसांड होत आहे हा वेळीच रोखला पाहिजे. तसेच तालुक्याच्या अन्य केंद्रावरही अशा प्रकारची घटना घडताना दिसत आहेत यामध्ये जातीने लक्ष घालून वरिष्ठ नागरिकांना दिलासा द्यावा अशा प्रकारची मागणी सामाजिक कार्यकर्ते व वरिष्ठ नागरिकांकडून होत आहे.

    

1 टिप्पणी:

  1. बहुतांश सरकारी लसीकरण केंद्रावर दिव्यांग, वृद्ध व आजारी लोकांना प्राथमिकता दिली जात नाही.

    उत्तर द्याहटवा