हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी
कोल्हापूर : जिल्ह्यात १५ ऑगस्टपासून खुली किंवा बंदिस्त उपाहारगृहे आसन व्यवस्थेच्या ५० टक्के क्षमतेने सुरू करण्यास आज परवानगी देण्यात आली. चित्रपट- नाट्यगृहे, मल्टिप्लेक्ससह धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत. सर्व दुकाने, मॉल्स रात्री दहापर्यंत खुली ठेवण्यास परवानगी असून, येथे काम करणाऱ्यांसह ग्राहकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे दोन डोस पूर्ण होऊन १४ दिवस पूर्ण होणे आवश्यक आहे. खुल्या मंगल कार्यालयांत आसन क्षमतेच्या ५० टक्के किंवा २००; तर बंदिस्त मंगल कार्यालयांत आसन क्षमतेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १०० व्यक्तींना परवानगी आहे. या संदर्भातील आदेश आज रात्री उशिरा जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा