प्रा.डॉ.प्रभाकर माने : मुख्य संपादक
शिवाजी विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना कक्षाच्या माध्यमातून विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात किंबहुना राष्ट्रीय पातळीवर नेहमीच राष्ट्रीय सेवाभावी वृत्तीने NSS चे स्वयंसेवकापासून ते संचालकापर्यंत सर्वच घटक अविरतपणे काम करीत असतात. श्रमाला प्रतिष्ठा देणे व संवेदनशील भावनेने समाजासाठी झपाटल्यासारखं काम करीत राहणे अशी त्यांची कार्यशैली बनलेली आहे. पद व प्रतिष्ठेसाठी काम नाही तर फक्त सेवाभावी वृत्तीने काम करण्यासाठी स्वतःला सर्वस्वी वाहून घेणे हे आता त्यांच्या अंगवळणी पडले आहे.
![]() |
उत्तम नेतृत्व प्रा.अभय जायभाये |
मात्र सर्वांना सार्थ अभिमान वाटावा अशी आनंददायी गोष्ट घडली की, राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये शिवाजी विद्यापीठास कार्यक्रम अधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार डॉ.सौ.शरयू भोसले, सरदार बाबासाहेब माने महाविद्यालय, रहिमतपूर यांना जाहीर झाला.तर सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार श्री अनिकेत वाघमारे, दहिवडी कॉलेज, दहिवडी यांना प्राप्त झाला आणि खऱ्या अर्थाने विद्यापीठाच्या सेवाभावी कार्याला यांच्या रूपाने अधिक बळ मिळाले.
मा.कुलगुरू डॉ.डी. टी. शिर्के,मा.प्र कुलगुरू डॉ.पी.एस.पाटील, कुलसचिव डॉ.व्ही.डी.नांदवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्तम नेतृत्व करणारे संचालक,प्रा.अभय जायभाये,राष्ट्रीय सेवा कक्षाकडून त्यांना मिळालेल्या या सुयशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला.
त्यांना मिळालेल्या पुरस्काराने शिवाजी विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागात उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात सर्वत्र त्यांचं कौतुक होत आहे.
पुरस्कार प्राप्त कार्यक्रमाधिकारी डॉ भोसले मॅडम व स्वयंसेवक अनिकेत यांचे अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा
उत्तर द्याहटवा