प्रविणकुमार माने : उपसंपादक
उदगाव ता.शिरोळ जि.कोल्हापूर येथे राहते घरातील दरवाजा उघडून एका अज्ञात चोरटयाने भरदिवसा चोरी केलेली आहे.याबाबत अधिक माहीती अशी की, सो निर्मला प्रकाश समडोळे व.व.54 रा.साखळे मळा, उदगाव या अंगणवाडी सेविका म्हणुन नोकरी करतात. त्या दि 10/08/2021 रोजी सकाळी 8.30 ते 8.40 वा सुमारास त्यांचे राहते घराचा दरवाजाला कडी लावून शेजारी राहत असणाऱ्या आकाराम बंडगर यांचे घरी दूध आणायला गेले असता एका अज्ञात चोरटयाने घराची कडी काढून घरात प्रवेश करून फिर्यादी निर्मला समडोळे यांचा रक्कम ₹ पाच हजार किंमतीचा पॅनासोनिक कंपनीचा व एअरटेल कंपनीच्या सिमकार्डसोबत मोबाईल फोन त्या अज्ञात चोरट्याने फिर्यादी च्या संमतीशिवाय,लबाडीने चोरून नेलेला आहे. त्याबाबत फिर्यादी सो निर्मला प्रकाश समडोळे यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे म.पो.हे.काॅ.सावंत यांनी अज्ञात चोरटय़ाविरुद्ध आय.पी.सी.कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे.सदर गुन्हयाचा तपास पो.ना.सुर्यवंशीसाहेब करीत आहेत.सदर प्रकरणामुळे उदगाव गावी भितीचे वातावरण निर्माण झालेले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा