Breaking

शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

केंद्रीय गृहमंत्रालयातर्फे उत्कृष्ट तपास कार्याबद्दल पोलीस उपअधीक्षक बी.बी.महामुनी यांना पदक जाहीर

 

पोलीस उपअधीक्षक मा.बी.बी.महामुनी


प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक


        इचलकरंजी :  इचलकरंजी पोलीस उपअधीक्षक बी.बी.महामुनी यांना केंद्रीय गृह मंत्रालय मार्फत उत्कृष्ट तपास कार्याबद्दल पदक जाहीर करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील ११ अधिकारी आहेत ही विशेष बाब आहे.

          पोलीस उपअधीक्षक महामुनी हे एप्रिल २०१९ मध्ये बुलढाणा जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. या नोकरीच्या दरम्यान एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार झाला होता या अत्यंत संवेदनशील गुन्ह्याचा तपास महामुनी यांनी आपल्या उत्तम हातोटीद्वारे उघडकीस आणला होता. या प्रकरणात दोघांना फाशीची शिक्षा झाली त्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे हे पदक जाहीर करण्यात आले आहे.

        महामुनी माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, संबंधित अल्पवयीन मुलगी पालकासोबत निद्रेत असताना आरोपीने तिचं अपहरण करून नंतर तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला होता या घटनेनंतर घटनेचे गांभीर्य पाहता चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यावेळी महामुनी यांनी या प्रकरणाचा सखोल तपास करून दोन आरोपींना अटक केली. त्यानंतर बुलढाणा विशेष न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.यामध्ये १५ जणांच्या साक्षी तपासून दोन्ही बाजूंच्या युक्तिवादानंतर न्यायालयाने दोघांना दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली होती.

     यातील एक विशेष बाब अशी होती कि, बुलढाणा न्यायालयाच्या इतिहासात जवळपास ५५ वर्षानंतर एखाद्या प्रकरणात आरोपींना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती त्यामुळे या प्रकरणाला आत्यंतिक महत्त्व प्राप्त झालं होतं.

       पोलीस उपअधीक्षक बी.बी. महामुनी यांना पदक जाहीर होताच सर्वत्र आनंदाचा वर्षाव होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा