प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रमुख प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाने कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर विविध शुल्कामध्ये विद्यार्थ्यांना सवलत देण्यासंदर्भात उच्च व विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांच्या पर क्रं. बैठक -२०२१ / प्र. क्र. १३७ विशि-३ दिनांक ३० जून, २०२१च्या संदर्भाने व्यवस्थापन परिषदेच्या झालेल्या ठरावास अनुसरून आदेशान्वये कळविण्यात येते की, खाली नमूद केल्याप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.
👉🏼 १) सन २०१९-२० मधील उन्हाळी सत्र मार्च २०२० च्या ऑक्टो / नोव्हे. *२०२० मध्ये आयोजित परीक्षांमध्ये carry forward* पद्धतीने निकाल जाहीर करण्यात आलेले आहेत अशा विद्यार्थ्यांचे अभ्यासक्रमाचे परीक्षा शुल्क महाविद्यालय / अधिविभाग/ विद्यापीठामार्फत *विद्यार्थ्यांना परत करावयाचे* असून याबा प्रस्तावपूरक कागदपत्रासह संबंधित परीक्षा विभागाकडे स्वतंत्रपणे सादर करण्यात यावेत.
👉🏼 २. सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाबाबत अनुदानित महाविद्यालये व विद्यापीठ अधिविभागातील सर्व अभ्यासक्रमांसाठी आकारण्यात येणान्या *इतर शुल्कांमधीन जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन / उपक्रमा कॉलेज मॅगझीन शुल्क,संगणक शुल्क निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिवल* ज्या बाबीवर कोणत्याही प्रकारे खर्च करण्यात आलेला नाही त्या बाबींसाठी *आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात यावे*.
👉🏼 ३. *प्रयोगशाळा व ग्रंथालय* यांची देखभाल व ग्रंथालयामध्ये ई-कन्टेंट विकत घेण्यासाठी खर्च करण्यात आला असल्याने याबाबतच्या *शुल्कामध्ये ५० % सवलत* देण्यात यावी.
👉🏼 ४. विद्याथ्र्यांद्वारे वसतिगृहाचा उपयोग करण्यात येत नसल्याने *वसतिगृह शुल्कापोटी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ* करण्यात यावे.
👉🏼५. *विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित महाविद्यालयांत देखील इतर शुल्कांमधीन जिमखाना शुल्क कि गुणदर्शन / उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगझीन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी,वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिवल* अशा ज्या बाबीवर कोणत्याही प्रकारे खर्च करण्यात आलेला नाही त्या बाबीसाठी आकारण्यात येणारे *शुल्क पूर्णपणे माफ करण्यात यावे. त्याचप्रमाणे प्रयोगशाळा व ग्रंथालय शुल्क या ५० % सवलत देण्यात यावी*.
👉🏼 ६.शैक्षणिक *वर्ष २०२१-२२ मध्ये जे विद्यार्थी पुढील वर्गात प्रवेशित होणार आहेत त्यांचे परत करावयाचे परीक्षा व शैक्षणिक शुल्क वगळून इतर शुल्काचे उपरोक्त *अ. क्र. २,३,४ व ५ मध्ये नमूद केले प्रमाणे समायोजन करण्यात यावे.*
👉🏼 ७.जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष *२०२० २१ मध्ये पदवी, पदव्युत्तर अंतिम वर्ष, अंतिम सत्र परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत त्यांचे देय ठरणारे परीक्षा व शैक्षणिक शुल्क वगळून इतर शुल्क परत करण्यात यावे.*
👉🏼 ८. *विद्यार्थ्यांकडे प्रलंबित असलेले शुल्क ३ ते ४ हप्त्यात भरण्याची सवलत* देण्यात यावी, तसेच शुल्क थकीत असेल तर *परीक्षेचा अर्ज करण्यास अडवू नये, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.*
अशा प्रकारची माहिती *शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव मा.डॉ.विलास नांदवडेकर* यांनी परिपत्रकाद्वारे देऊन उचित कार्यवाही करण्यासंदर्भात कळविले आहे.
बर्याच college नी फॉर्म भरताना आडवनुक केली आहे .पैसे bhralaynantarch फार्म भरुन घेतले त्याना काय करणार.
उत्तर द्याहटवा