९१ हजार जणांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण
मुंबई: प्रवेश परीक्षा घेतल्यानंतरच काही अभ्यासक्रमांना प्रवेश दिला जात आहे. मात्र पदवी प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेणार नसल्याचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले आहे.
मंगळवारी दुपारी राज्य शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा निकाल जाहीर केला. राज्याचा सरासरी निकाल ९९ टक्क्यांच्या वर लागला आहे.त्यामुळे एवढ्या विद्यार्थ्यांना पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश कसे मिळणार? निकष काय असतील अशी चर्चा सुरू झाली.
*बारावीचा बोर्डाचा जो निकाल लागला आहे, त्याच्या आधारावरच आर्ट्स, सायन्स, कॉमर्स या पारंपरिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाईल.
*तुकड्यांची किंवा विद्यार्थ्यांच्या संख्येची आवश्यकता असेल, तर ३१ तारखेआधी आमच्याकडे त्यासंदर्भात प्रस्ताव सादर करावेत.
एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी विद्यापीठाने घ्यायला हवी, अशा सूचना दिल्या आहेत.’
काही अभ्यासक्रमांना सीईटी
सामंत यांनी सांगितले, काही प्रोफेशनल कोर्ससाठी २६ ऑगस्टपासून सीईटीची प्रक्रिया सुरु होईल,’ मागील वर्षी ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी सीईटी नव्हती, त्या अभ्यासक्रमांना यावेळेस देखील सीईटी नसेल.
इंजिनीअरिंग प्रवेशासाठी दोन सत्रात सीईटी परीक्षा असेल. पहिले सत्र १४ सप्टेंबरपासून, तर दुसरे सत्र १९ सप्टेंबरपासून सुरू होईल.
या अभ्यासक्रमांसाठी सीईटी
एमबीए, एमसीएम, आर्किटेक्चर, बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट,बी एड् अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षा द्यावी लागणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा