Breaking

सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१

जयसिंगपूरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची मोठी कारवाई ; पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांचे डॅशिंग दर्शन

 


*प्रा.डॉ.प्रभाकर माने :  मुख्य संपादक*


    जयसिंगपूरातील दहाव्या गल्लीच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून 48 जणांना ताब्यात घेतलं असून 97 हजार  रोख व 17 लाख 7 हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.       

   10 व्या गल्लीतील कलश कला,क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली सुरू असलेल्या तीन पाणी जुगार सुरू असलेल्या अड्ड्यावर   पोलिसांनी रविवारी छापा टाकून 48 जणांच्या मुसक्या आवळल्या  आहेत.कारवाईत रोख  97 हजार रुपये एकूण 17 लाख 7 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 

     नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी पदभार घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी केलेल्या मोठ्या कारवाईने अवैध धंदेवाल्यांची धाबे दणाणले आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार शहरातील मध्यवस्तीत अरुण पांडुरंग परुळेकर यांच्या मालकीच्या चंद्र हिरा अपार्टमेंटमध्ये  कलश कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या नावाखाली जुगार अड्डा सुरू होता. या कारवाईत 1 चारचाकी, 6 मोटारसायकली ,39 मोबाईल,१७ टेबल व 6 खुर्च्यासह एकूण 97 हजार 620 रुपयांची रोकड असा एकूण 17 लाख 6 हजार 920 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. त्या ठिकाणी मद्यपान सुरु होते तसेच कोराना नियमांचं उल्लंघन करण्यात आलं होतं त्यावर खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने छापा टाकून संयुक्त कारवाई केली. आणि सुरु होतो तसेच थोडा नियमांचे उल्लंघन करण्यात आलं होतं.

       यामध्ये अटक करण्यात आलेली आरोपी हे जयसिंगपूर, इचलकरंजी, कबनूर ,सांगली, चंदुर, मौजे आगर, उमळवाड,यड्राव,सांगली,अंकली, कुरुंदवाड, उदगाव,शिरोळ,हेरवाड, धरणगुत्ती, बोरगाव ब मिरज या गावातील आहेत.

    पोलीस नाईक स्मिता कांबळे, आनंदा बंडगर, पोलीस कॉन्स्टेबल अभिजीत भातमारे, रोहित डावाळे, संदेश शेटे, शशिकांत भोसले, मंगेश पाटील ,विजय पाटील ,प्रवीण जाधव ,जावेद पठाण,वैभव सुर्यवंशी व पल्लवी चव्हाण यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.पोलीस कॉन्स्टेबल अमोल अवघडे यांनी फिर्याद दिली आहे. 

      नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच आपल्या डॅशिंग व्यक्तिमत्त्वाचा एक पैलू व अवैद्य धंदे वाल्यांचा कर्दनकाळ अशा पद्धतीचे रूप समोर येताना दिसत आहे. त्यांच्या या धाडसाचं व मोठ्या कारवाईबद्दल जयसिंगपूर शहर व परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा