Breaking

सोमवार, ३० ऑगस्ट, २०२१



रोहित जाधव : शिरोळ तालुका प्रमुख प्रतिनिधी


   कोथळी येथील मातोश्री सोशल फाउंडेशनच्या प्रथम वर्धापन दिनाचे औचित्य साधून मातोश्री सोशल फाउंडेशन कडून सद्यपरिस्थितीत असणारी गरज ओळखून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या रक्तदान शिबिरास मातोश्री सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष जीवन आवळे यांनी सर्वप्रथम रक्तदान करून या शिबिराची पारंभ केला. मातोश्री सोशल फाउंडेशन कडून कोथळी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.


    तसेच या शिबिरास रक्तदात्याकडून चांगला प्रतिसाद मिळत, गावातील प्रत्येक तरुण वर्गाने या शिबीरामध्ये सहभागी घेतला. शिबिर यशस्वीपणे पार पडण्यासाठी मातोश्री सोशल फाउंडेशन सर्व पदाधिकारी व सदस्यांनी खूप चांगली कामगिरी केल्याचे उदगार सरपंच पाटील यांनी काढून मातोश्रीच्या कार्याला शुभेच्छा देत इथून पुढे असेच समाजहिताचे कार्य करावे अशा शुभेच्छा दिल्या.     

    यावेळी मातोश्री सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष जीवन आवळे यांनी या शिबिराचे महत्त्व सांगताना म्हणाले की, सद्य परिस्थितीमध्ये रक्ताचा खूप मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत असल्यामुळे प्रत्येकाने रक्तदान करणे हे आवश्यकता नसून तर ती आता  गरज बनली आहे. कोरोनाच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत होता. आता सर्वांनी रक्तदान करण्याची गरज आहे कारण सद्य परिस्थितीमध्ये कोरोनाचे रुग्ण जरी कमी असले तरी भविष्यामध्ये आपल्याला रक्ताची आवश्यकता भासू शकते म्हणूनच या रक्तदान शिबिराचे आयोजन करून पुढील काळातील रक्त तुटवडा कमी करण्याचा प्रयत्न आम्ही या मातोश्री सोशल फाउंडेशनच्या प्रथम वर्धापन दिनी केला आहे.  या कार्यक्रमा मध्ये विशेष सहकार्य आधार ब्लड बँक इचलकरंजी यांचे लाभले

            सदर कार्यक्रमास उपसरपंच आकाराम धनगर ग्रामपंचायत सदस्य नितीन वायदंडे, सदस्य शरद कांबळे, हर्षल यादव, आधार ब्लड बँकेचे प्रमुख डॉ. संजय टकले, डॉ. प्रसन्न पुरोहित, शुभांगी सामंत, सचिन सकते, शुभम पाटील ऋतुजा मालकर,  पत्रकार रोहित जाधव, मातोश्री सोशल फाउंडेशनचे  उपाध्यक्ष अमोल बरकडे, सचिव सुशांत चूडाप्पा ,खजिनदार रमेश घाटगे ,सदस्य विठ्ठल गुदळे, सदस्य गौरव गांजे, उमेश पवार, किसन भोसले, अर्जुनसिंग राजपूत अल्ताफ आवटी ,रशीद मुल्ला व इतर मंडळींचे सहकार्य लाभले.

३ टिप्पण्या:

  1. मातोश्री फाउंडेशन चे काम खूप कौतुकास्पद आहे,विविध सामाजिक उपक्रम ते कायम राबवत असतात,जीवन आवळे आणि त्यांच्या टीम ला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

    उत्तर द्याहटवा