![]() |
प्रा. समीर गायकवाड |
प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
जयसिंगपूर : हातकणंगले येथील अण्णासाहेब डांगे महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागाचे प्रा.समीर हिंदूराव गायकवाड यांना शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. ही पदवी संपादित केली. 'हरितक्रांतीचा कोल्हापूर जिल्ह्यातील निवडक पिकावरील झालेला परिणाम' या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण व संशोधनात्मक काम केले आहेत. तसेच पीएच.डी.मार्गदर्शक म्हणून सर्वश्रुत असणाऱ्या व अर्थशास्त्राचे गाढे अभ्यासक प्रा.डॉ.रूपा शहा यांचे मार्गदर्शन लाभले.
संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, सचिव ॲड. राजेंद्र डांगे, खजिनदार विठ्ठलराव मुसाई, कार्यशील प्राचार्या डॉ. योजना जुगळे यांचे यथोचित मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले. त्यांच्या या सुयशात कुटुंबीयांची मोलाची साथ लाभली.
प्रा.समीर गायकवाड एक अर्थशास्त्राचे अभ्यासू व कष्टाळू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख सर्वत्र आहे. अर्थशास्त्र विषयासाठी त्यांनी दिलेलं योगदान खूप महत्त्वाचे आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून त्यांनी केलेले काम हे सुपरिचित असून एक संवेदनशील व विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख आहे.
शिवाजी विद्यापीठाची पीएच.डी. पदवी संपादित केल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या संशोधन कार्याचा निश्चितपणे समाजाला उपयोग होणार आहे. त्यांच्या पुढील संशोधन कार्यास व भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा