Breaking

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

वाहनात सापडला मृतदेह : तपासाची सूत्रे गतिमान

 



प्रविणकुमार माने : उपसंपादक


   सातारा : येथील एमआयडीसी येथील बोर फाटा याठिकाणी आज (बुधवार) सकाळी ८.०० च्या सुमारास चार चाकीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला.

       त्याची माहिती मिळताच पाेलिस घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार वाहना नजीक केक कापण्यात आला आहे. यामुळे हा घातपात असू शकताे. त्यादृष्टीने तपास करीत आहाेत असे पाेलिसांनी नमूद केले. या प्रकरणाचा सखोल तपास सातारा पोलिस दल करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

      संबंधित वाहनाचे पासिंग हे पुण्याचे आहे. या वाहनाचा क्रमांक एम एच १२ एफएक्स ४८४० असा आहे. या वाहनातील मृत व्यक्तीचे नाव रविंद्र यशवंत शेलार (व.व.४०) राहणार कारंडवाडीचा असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

       सदर घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली असून लोकांच्या मधून उलट-सुलट प्रतिक्रिया येत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा