शशिकांत घाटगे : विशेष प्रतिनिधी
ख्रिस्ती चर्च ऑफ दि नॅझरिन आणि एन सी एम ईंडिया आरगनजाईशन पास्टर पीटर पौल जाॅर्ज पुणे यांच्या सहकार्याने शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त गावातील जनतेला धान्य वाटप करण्यात आले.
शिरोळ तालुक्यासह सांगली, कोल्हापूर व इचलकरंजी येथील पूरग्रस्त बंधू-भगिनींना ख्रिस्ती संस्थेकडून धान्याचे वाटप मानवतावादी भावनेतून करण्यात आले.सन २०२१च्या महापुरामुळे शिरोळ तालुक्यातील तसेच सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावे पूर बाधित झाल्याने अनेक ठिकाणी आर्थिक नुकसान झाले आहे. सरकारकडून मिळणारी मदत ही तूटपुंजी असल्यामुळे अत्यंत गरीब सामान्य जनता व वंचित घटकांना आधार होण्यासाठी ख्रिस्ती चर्च ऑफ दि नॅझरिन आणि एन सी एम ईंडिया ऑर्गनायझेशन पास्टर पीटर पौल जाॅर्ज पुणे यांच्या सहकार्याने शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्त गावातील जनतेला धान्य स्वरूपात तसेच खोतवाडी येथील चर्चमध्ये मदत करण्यात आली. यावेळी असतं पास्टर किशोर पाटोळे पुणे,पास्टर याकूब गोडे पुणे,पास्टर प्रसन्ना काळे व खोतवाडी येथील पास्टर नंदकुमार कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये हे वाटप करण्यात आले.
या पुणेस्थित ख्रिस्ती संस्थेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा