हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी
▪️दत्तवाड (ता. शिरोळ) येथून बेपत्ता झालेल्या साक्षी दशरथ काटकर (वय 17) हिचा मृतदेह कल्लोळ (ता. चिकोडी) येथील दूधगंगा नदीच्या पात्रात सोमवारी सापडला. दरम्यान, मुलगी सासरी नांदत नसल्याने बापानेच मुलीला दानवाड (ता. शिरोळ) येथील दूधगंगा नदीच्या पुलावरून ढकलून दिल्याची चर्चा होती.त्यामुळे या संशयावरून दशरथ काटकर याला कुरूंदवाड पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, हा खून की आत्महत्या, हे अस्पष्ट असून याबाबत उलटसुलट चर्चा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा