Breaking

रविवार, १ ऑगस्ट, २०२१

आजीच्या दशक्रियाविधी कार्यक्रमासाठी गेलेल्या दोघा नातवांचा पाण्यात बुडून दुर्देवी मृत्यू

 


        आजीच्या दशक्रियाविधी कार्यक्रमासाठी गेलेल्या दोघा नातवांचा नदीवर आंघोळ करतेवेळी बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मनीष टोपमे आणि ईश्वर टोपमे अशी मृत्यू पावलेल्यांची नावे आहेत. ही घटना अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील खानापूर गवळी गावात घडली.

     मनीष व ईश्वर यांच्या आजीचे दहा दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर आज दशक्रिया चा कार्यक्रम गावातील एका नदीकाठीच्या मंदिर परिसरात आयोजित करण्यात आला होता. यावेळी दोघे तरूण आपल्या कुटुंबियांसोबत नदीवर गेले होते.

     यावेळी नातू मनीष व ईश्वर दोघेही नदीत आंघोळीला गेले. दरम्यान नदीला जास्त पाणी असल्याने हे दोघे भाऊ नदीतील भोवऱ्यात अडकून यांचा मृत्यू झाला

    यावेळी नातेवाईकांनी नदीत उतरून या दोघांनाही जीव वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. परंतु दुर्दैवाने या दोघांचाही मृत्यू झाला. एकीकडे आई गेल्याचे कुटुंबावर दुःख त्यातच दोन मुलेही नदीत बुडून मृत्युमुखी पडल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा