Breaking

रविवार, १ ऑगस्ट, २०२१

जयसिंगपूर मधील मातंग समाजाच्या उत्थानासाठी व समाज मंदिर बांधून देण्याबाबत आम्ही कटिबद्ध : उपनगराध्यक्ष संजय पाटील- यड्रावकर

 


प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक


जयसिंगपूर : अण्णाभाऊ साठे तरुण मंडळ व छ. संभाजीनगर तरुण मंडळ यांच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 101 जयंती निमित्त आनंदमय वैचारिक सोहळा संपन्न झाला. यावेळी जयसिंगपूर नगरीचे उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

      सुरुवातीस लोकशाहीर आण्णाभाऊ साठे मंडळाच्यावतीने सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, उपस्थित नगरसेवक व प्रतिष्ठित नागरिक या सर्वांचे स्वागत पत्रकार प्रा.डॉ. प्रभाकर माने यांनी केले. तसेच प्रास्ताविकामध्ये अण्णाभाऊ साठे तरुण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या रचनात्मक कार्यक्रमाचा ही उल्लेख केला.यावेळी संजय पाटील यड्रावकरानी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

            याप्रसंगी संजय पाटील यड्रावकर म्हणाले की, स्वातंत्र्य,समता व न्याय या हक्कासाठी जीवाची सर्वस्वी बाजी लावणारे, शेतकरी कामगार व तमाम वंचित घटकाचे तारणहार म्हणून ज्यांनी लेखणीच्या माध्यमातून समाज प्रबोधन व परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. तसेच अण्णाभाऊंची शैक्षणिक पार्श्वभूमी दीड दिवसाचा असताना देखील एखाद्या आंतरराष्ट्रीय व्यक्तिमत्व असलेले बंडखोर साहित्यकाच्या लेखणीच्या माध्यमातून दलित व वंचित घटकांसाठी आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. खरोखरच अण्णा होते म्हणून महाराष्ट्र राज्य अस्तित्वाला आधार मिळाला अशा प्रकारचे वक्तव्य करून तसेच अण्णाभाऊंचे आंतरराष्ट्रीय लढाऊ व राजकीय अस्तित्व आपल्या भाषणामध्ये अधोरेखित केले.

        यावेळी समस्त मातंग समाज बांधवांच्या वतीने गौतम आवळे यांनी अण्णाभाऊच्या जन्म शताब्दीचे औचित्य साधून जयसिंगपूर मधील मातंग समाजासाठी खुली जागा देऊन त्यावर समाज मंदिर बांधून मिळावे अशी मागणी मौखिक व विनंती अर्जाद्वारे केली. यावेळी संजय पाटील यड्रावकरानी आम्ही मातंग समाजाच्या उत्थानासाठी व समाजमंदिर बांधून देण्याबाबत कटिबद्ध आहोत. पुढच्या जयंतीच्या वेळेस आपल्या मागणी अर्जाचा विचार करून अंशतः किंवा पूर्णतः कृती करण्याचा प्रयत्न करणार आहोत अशाप्रकारे त्यांनी आश्वासित केले.

    या कार्यक्रमा प्रसंगी नगरसेवक गणेश गायकवाड, महेश कलकुटगी,राहुल बंडगर, सामाजिक कार्यकर्ते विनायक गायकवाड ,प्रतिष्ठित नागरिक व मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.छोटू भंडारे , राहूल आवळे , रोहित पाथरवट , निवास वडर , सूरज आवळे , विशाल पूजारी , पवन भंडारे , गोटू भंडारे , चंद्रकात भंडारे , सौरभ तिवडे,सतिश भंडारे, आण्णाभाऊ साठे तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी सदस्य  व नामदार यड्रावकर सोशल फौंडेशन जयसिंगपूर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा