प्रा.अमोल सुंके : अकिवाट प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील येऊन गेलेल्या महापूरामुळे सर्वचं स्थारातील जनतेचं मोठं नुकसान झालं आहे. अकिवाट हे गाव महापुराचा जोरदार फटका बसणाऱ्या गावांपैकी एक आहे.त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर व व्यापाऱ्यांच झालेलं मोठं नुकसान भरून काढण्यासाठी 100% गावाला नुकसान भरपाई मिळावी यासाठी सर्वपक्षीय पूरग्रस्थ कृती समिती,अकिवाट यांच्यावतीने मोर्चा काढण्यात आला.
या काळात गावकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी सर्व गावकऱ्यांनी पक्षाची मर्यादा बाजूला सारून एकत्र येवून आंदोलन केले. शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं तसेच व्यापाऱ्यांना ही आपले सर्व साहित्य स्थलांतरीत कराव लागलं त्यामुळे त्याच्या अनुदानाची विचार करण्यात यावा हा आंदोलकांचा सूर होता.
आंदोलनात व्यापारी आणि शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणावर समविष्ट झाला होता.शेतमजुरांच्या कामावरही महापूरामुळे मोठ्या प्रमाणावर झालाय त्यामुळे त्यांनाही अनुदान मिळावे अशी मागणी सरपंच विशाल चौगुले यांनी केली. "या कठीण संकटाच्या काळात माझ्या बरोबर ग्रामपंचायत सदस्य गावकऱ्यांच्या पाठीशी आहोत आणि त्यांच्यासाठी लढा देत आहोत" असे आवाहन सरपंचांनी केले.
गावात मोर्चा काढून गाव-चावडीसमोर सरपंच विशाल चौगुले ,सर्व ग्रा.प. सदस्य ,माजी जि.प. सदस्य इकबाल बैरागदार आणि गावकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे लिहिलेलं लेखी निवेदन तलाठ्यांकडे सुपूर्द करण्यात केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा