Breaking

शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

मातोश्री सोशल फाउंडेशन ; पुनश्च एकदा धावली पूरग्रस्तांच्या मदतीला


मातोश्री सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष
श्री.व सौ.जीवन व श्रेया आवळे


 गीता माने : सहसंपादक


     मातोश्री सोशल फाउंडेशनकडून एकाच वेळी अनेक गावातील पुरग्रस्तांना मदत करण्यात आली. मातोश्री सोशल फाउंडेशनकडून  पूर ओसरल्यानंतर पूरग्रस्तांना लागणारी जीवनावश्यक वस्तूंची गरज ओळखून मातोश्री सोशल फाउंडेशनकडून १००० कुटुंबीयांना एकाच वेळी अनेक गावांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. यावेळी मातोश्री सोशल फाउंडेशनचे कार्यशील अध्यक्ष जीवन आवळे यांच्या पत्नी सौ.श्रेया जीवन आवळे यांच्या हस्ते मंगेशनगर कोथळी येथील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा,  कोथळी येथे अध्यक्ष जीवन आवळे व सचिव सुशांत चुडाप्पा यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, उमळवाड येथे उपाध्यक्ष अमोल बरकडे व सदस्य गौरव गांजे यांच्या हस्ते जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा,हेरवाड येथे खजिनदार रमेश घाटगे,सदस्य अर्जुनसिंग राजपूत व सदस्य उमेश पवार यांच्या हस्ते जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला. 

     मातोश्री सोशल फाउंडेशनकडून एकाच वेळी अनेक ठिकाणी मदत पोहोचविण्यात आली.या फाउंडेशन निस्वार्थी भावनेने व समाजाप्रति असलेली बांधिलकी जपत योग्य वेळेला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करून पूरग्रस्तांच्या चेहऱ्यावर आनंद आणण्याचा प्रयत्न केला. मातोश्री फाऊंडेशनने शिरोळ तालुक्यातील या निवडक गावांमध्ये केलेल्या उच्चकोटीच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

      मातोश्री सोशल फाउंडेशने केलेली मदत फार उपयुक्त व प्रेरणादायी असल्याचे उदगार सामाजिक कार्यकर्ते श्री.बाहुबली भानजे यांनी काढून मातोश्री सोशल फाउंडेशनच्या केलेल्या कार्याची प्रशंसा केली व इथून पुढे समाज हितार्थ कार्य करावे अशा शुभेच्छा दिल्या. 

      यावेळी सामाजिक कार्यकर्ते कासमअली फकीर,सदस्य किसन भोसले, विठ्ठल गुदळे, यश तिवडे, सुनिल आवळे,सुनिल चौगुले व अन्य घटक यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा