नवी दिल्ली - इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited -IOCL)मध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे.
इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये अनेक पदांवर भरती आहे. तब्बल 480 पदांसाठी भरती होणार असून नोटीफिकेशन जारी करण्यात आली आहे. टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अप्रेंटिस या पदासाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 ऑगस्ट 2021 असणार आहे.
👉🏼 इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडची अधिकृत वेबसाईट iocl.com वर जाऊन इच्छूक उमेदवार अर्ज करू शकतात.
जागा
टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अप्रेंटिस - 480
शैक्षणिक पात्रता
टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अप्रेंटिससाठी बारावी आणि कोणत्याही क्षेत्रात ITI उत्तीर्ण असणं आवश्यक.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा