बर्लिन: तालिबानने अफगाणिस्तानचा ताबा मिळवला आणि त्यानंतर हजारो अफगाण नागरिकांनी देश सोडून जात आहेत. अफगाणिस्तान सोडून जाणाऱ्या लोकांमध्ये सामान्य नागरिक ते तेथील कलाकार, राजकारण, डॉक्टर अशा विविध क्षेत्रातील नागरिकांचा समावेश आहे. तेथील नागरिकांसमोर त्यांच्या भवितव्याबाबत चिंतेचे वातावरण आहे. तर कधीकाळी अफगाणिस्तान सरकारमध्ये Afghanistan Government मंत्री असलेले सय्यद अहमद शाह सदातयांनी देखील देश सोडला. त्यांनी जर्मनी मध्ये आश्रय घेतला आहे. तर Leipzig शहरात चक्क पिझ्झा डिलिव्हरी Pizza Delivery बॉय म्हणून काम करत आहेत. एका वृत्तपत्राने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यामुळे डिलिव्हरी करतानाचा सदातयांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
माहितीनुसार, सदातहे 2018 मध्ये अफगाणिस्तान सरकारमध्ये मंत्री होते आणि 2020 मध्ये ते निवृत्त झाले. त्यानंतर जर्मनीत त्यांनी स्थायिक झाले आणि सुरुवातीचे काही दिवस सुखात गेले. मात्र, उदभवलेल्या आर्थिक अडचणीमुळे त्यांना हे काम करायला भाग पडले. त्यामुळे त्यांना येथे पोटापाण्यासाठी ते पिझ्झा डिलिवरी करत आहे.
कधी काळी होते अफगाणिस्तानचे मंत्री, आता विकतात पिझ्झा !
दिव्यात रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या नागरिकांतर्फे साखळी उपोषणाला सुरवात
जर्मनी येथील स्थानिक माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, माजी मंत्री सदातयांनी सांगितले की, सध्या ते एक सामान्य आयुष्य जगत आहे. जर्मनीत सुरक्षित वातावरण आहे आणि ते कुटुंबासह तेथे वास्तव्य करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा