![]() |
संग्रहित छायाचित्र |
हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी
शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी पंचगंगा नदीत उडी टाकून आंदोलन केले. शिये गावातील पूरग्रस्तांचे गावातच पुनर्वसन करा, यासह अन्य मागण्यांसाठी रघुनाथदादा पाटीलप्रणीत शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी दुपारी पंचगंगा नदीत उडी टाकून आंदोलन केले.यावेळी पोलिस आणि ‘एनडीआरएफ’च्या जवानांची चांगलीच भंबेरी उडाली. कार्यकर्त्यांना पाण्यातून बाहेर काढत असताना झटापट झाली. अखेर पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. करवीर पोलिस ठाण्यात आणून नंतर सोडून दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा