Breaking

सोमवार, ९ ऑगस्ट, २०२१

*कोल्हापूर : गर्भलिंग निदान; डॉक्टरपत्नी ताब्यात*

 


हेमंत कांबळे :कोल्हापूर शहर प्रतिनिधी


▪️परिते (ता. करवीर) येथील गर्भलिंग निदान सेंटर प्रकरणी कागल तालुक्यातील डॉक्टरपत्नीचे नाव निष्पन्न झाले आहे. करवीर पोलिसांनी संशयित महिलेला रविवारी सकाळी ताब्यात घेतले. ही महिला वैद्यकीय तपासणीत कोरोनाबाधित आढळल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. तिला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.गर्भलिंग निदान सेंटरप्रकरणी ताब्यात घेतलेल्यांची संख्या आता 11 झाली आहे. रविवारी ताब्यात घेण्यात आलेली महिला ही मुख्य संशयित राणी कांबळेची विश्वासू साथीदार होती. कागल तालुक्यातील स्वत:च्या घरात राणी कांबळे हिच्या मदतीने गर्भवती महिलांची सोनोग्राफी मशिनद्वारे तपासणी करण्यात येत होती, अशी माहिती चौकशीत निष्पन्न झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा