प्रा.डॉ. प्रभाकर माने : मुख्य संपादक
शिवाजी विद्यापीठ परीक्षा विभागाच्या वतीने उन्हाळी परीक्षाची तयारी पूर्ण झाली असून या परीक्षेसाठी प्रॉक्सी कॅमेराचा वापर करण्यात येणार आहे. हे या परीक्षेचे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. या परीक्षेला सामोरे जाताना परीक्षार्थींना महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या पुढील प्रमाणे आहेत.
👉🏼 *सिस्टमची आवश्यकता/ System Requicuments:👇*
१. चालू स्थितीतील कॅमेरा असलेले अँड्रॉईड फोन, डेस्कटॉप कॉम्प्युटर, लॅपटॉप (विंडोज,लिनक्स, मॅक),
२. चालू स्थितीतील सुयोग्य स्पीडचे इंटरनेट असणे आवश्यक आहे.
३. तुमचे ब्राऊजर हे अपडेटेड / अद्ययावत असणे आवश्यक आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
👉🏼 *उमेदवार सूचना / Candidate Instructions:*✍️
IMP Nota: Mock (Practice) Examination is compulsory for all student.
१. तुम्ही परीक्षेसाठी वापरणार असलेले उपकरण (अँड्रॉईड फोन, डेस्कटॉप कॉम्प्युटर,लॅपटॉप) फुल चार्ज असणे आवश्यक आहे.
२. युजर आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी तुमचा विद्यापीठाशी संलग्नित असलेला मेल इनबॉक्स अथवा तुमच्या मोबाइल मधील विद्यापीठाने पाठवलेला मेसेज पाहावा.
३. जर तुम्ही मोबाइल वरून परीक्षा देत असाल तर सर्व नोटिफिकेशन्स परीक्षा कालावधीत बंद ठेवा.
४. परीक्षा सुरु करण्यासाठी पुढील लिंक वरती क्लिक करा. https:/su- exam.cdoinp.co.in/
५.परीक्षा सुरु करण्याकरीता कॅमेरा चालू करण्याची परवानगी द्यावी.
६. तुमच्या संदर्भासाठी तुमच्या लोमिनं मध्ये दिलेले वेळापत्रक तपासून पहा. दिलेल्या वेळापत्रका संदर्भात काही तक्रार असल्यास विद्यापीठातील संबंधित डिपार्टमेंटशी संपर्क करा.👇
B.A. :- 0231-2609116/2609115
BBA,BCA,B.Com.:- 0231-2609117
MA : -0231-2609120
BSc,MSc:.-0231-2609118
Distance -: 0231-2609451/260949452/2609105
७.आपणास परीक्षे संदर्भात काही मदत हवी असल्यास तुमच्या लॉगिन मध्ये दिलेले FAQs पाहू शकता.
८. परीक्षे संदर्भात काही तांत्रिक मदत हवी असल्यास चॅट बटन वरती क्लिक करून तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. अथवा तुमच्या लॉगिन मध्ये दिलेल्या हेल्पलाइन नंबरशी संपर्क करू शकता.
९.वारंवार विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांच्या (FAQ's) व्यतिरिक्त जर आपणांस अन्य तक्रार करावयाची असल्यास "How can we help you" या बटन वरती क्लिक करून विचारलेली माहिती भरून तक्रार नोंदवावी.
१०.परीक्षा कालावधी संपण्यापूर्वी जर आपणास परीक्षा पूर्ण करावयाची असेल तर सबमिट टेस्ट बटण वरती क्लीक करावे. विहित कालावधीत जर सबमिट बटण नाही दाबले तर आपली परीक्षा ऍटोमॅटिकली सबमिट करून घेतली जाईल.
👉🏼 *फोटो ओळखपत्र पडताळणी / Photo ID Verification*👇
१. तुमची ओळख पटविण्याकरीता पुढील पैकी कोणतेही एक फोटो ओळखपत्र सादर करावे (आधार कार्ड पॅन कार्ड / महाविद्यालय ओळखपत्र)
२.आपला चेहरा वेबकॅम अथवा मोबाईलच्या समोर आणा जेणेकरून सिस्टिम आपला चेहरा आपल्या फोटो ओळखपत्राबरोबर तपासून पाहू शकेल.
३.आपला फोटो पडताळणीमध्ये यशस्वीरीत्या मॅच झाल्यानंतरच आपली परीक्षा चालू होईल.
🔴 *परीक्षा पर्यवेक्षण / Exam Monitoring* 🔴
१. वेब कॅमद्वारा परीक्षा सुरु असताना तुमचे वेळोवेळी फोटो काढले जातील. व आपण काही गैर प्रकार करीत नाही याची सतत पडताळणी होत राहील.
२. आम्ही आपल्या परीक्षेचे सतत पर्यवेक्षण करत राहू काही गैरप्रकार आढळल्यास आपली परीक्षा त्वरित स्थगित केली जाईल.
३.परीक्षा सुरु असताना विद्यार्थ्याने कोणत्याही प्रकारे बोलणे अथवा खुणा करु नये.
४.परीक्षा देताना विद्यार्थी बसला असेल त्या खोलीत विद्यार्थी सोडून दुसरे कोणीही असता कामा नये.
👉🏼 *परीक्षेची सुरुवात कशी करावी / How to login exam*👇
१.गुगल क्रोमचे अपडेटेड व्हर्जन वापरून त्यात परीक्षेची लिंक ओपन करा (https://sou-exam.eduapp.co.in/)
२. तुमचा युजर आयडी/ पी आर एन(PRN)आणि पासवर्ड प्रविष्ट अथवा एंटर करा.
३. ४अंकी कॅप्चा कोड एंटर करा.
४. टर्म्स आणि कंडिशनमध्ये क्लीक करा.
५.लॉगिन बटन वरती क्लिक करा.
वरील सर्व सूचनांचे तंतोतंत पालन करून संबंधित परीक्षार्थी उमेदवाराने परीक्षेला सामोरे जावे.अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी व दिलेले यूजर आयडी - पासवर्ड वापरून विद्यार्थ्यांनी मोक टेस्ट द्यावी म्हणजे मुख्य परीक्षेमध्ये कोणत्याही तांत्रिक अडचणी येणार नाहीत. अशा प्रकारची माहिती व आवाहन मा.गजानन पळसे,प्र.संचालक,परीक्षा विभाग व मूल्यमापन मंडळ शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा