मुंबई - पॉर्नोग्राफी प्रकरणात मुंबई पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक केली. सध्या राज कुंद्रा न्यायालयीन कोठडीत असून राज कुंद्रा विरोधात अनेक पुरावे हाती लागल्यामुळे राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली. दरम्यान राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीची काही बँक खाती देखील या कारवाईत सील करण्यात आली आहेत.
राज कुंद्रा अटकेत असतानाच आता शिल्पा शेट्टीच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. कारण आयोसिस वेलनेस सेंटरच्या नावावर अनेक लोकांची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप शिल्पा शेट्टी आणि तिची आई सुनंदा शेट्टी यांच्यावर करण्यात आला आहे. शिल्पा शेट्टी आणि तिच्या आई विरोधात लखनऊमधील हसरतगंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर आता लखनऊ पोलिसांची टीम या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी मुंबईत दाखल झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा