प्रा.अक्षय माने : कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाने कोरोना महामारीची गंभीर परिस्थिती पाहून तसेच विद्यार्थ्यांना ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थी सुविधा केंद्रामार्फत उपलब्ध असणा-या सर्व सेवा (second Copy of Marksheet. Transfer/Migration Cetificate, Rank/Merit/Passing Certificate, Medium of Instruction, Special Certificate, Transcript. Verification, Change in Name, Attastation) घेण्यासाठी सध्या प्रत्यक्ष येवून अर्ज करावा लागतो, त्यांना शुल्क भरावे लागते यामध्ये विद्यार्थ्यांचा वेळ आणि आर्थिक खर्च होतो.विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेवून विद्यापीठाने स्वनिर्मित ऑनलाईन संगणकप्रणाली विकसीत केलेली असून याप्रणालीतून अर्जदारास ऑनलाईन अर्ज करणे शुल्क भरणे या बाबी सध्या असणा-या ठिकाणाहून करता येणार आहेत. अर्ज प्राप्त झाल्यानंतर (Second Copy of Marksheet, Transfer/Migration Certificate, Rank/Merit/Passing Certificate, Medium of Instruction, Special Certificate, Change in Name) अर्जदारास सॉफ्ट कॉपी ई-मेल द्वारे सत्वर पाठविण्यात येणार असून त्याच्या Hard Copy अर्जदारांच्या विनंतीनुसार टपालाद्वारे / हस्ते देण्यात येणार आहे. सदरच्या सुविधेमुळे विद्यार्थ्यांचा वेळ आणि सर्व वाचणार असून संबंधीत अर्जदारानी खालील लिंकचा वापर अर्ज करण्यासाठी करावा असे विद्यापीठाच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.
E-Mail: sfc@unishivaji.ac.in
studentapps.unishivaji.ac.in/suksfc/ http://webapps.unishivaji.ac.in
या page वर Students online Aplications या Tab ही सेवा उपलब्ध होईल.
(Note: Transcript, Verification, Attastation या सेवांची Soft Copy पाठविण्यात येणार नाही सदरची कागदपत्रे अर्जदारा विनतीनुसार By Post/By Hand पाठविण्यात येतील.)
अशा प्रकारची माहिती मा गजानन पळसे. प्र-संचालक परीक्षा व मूल्यमापन मंडळ यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा