*हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी*
कोल्हापुरातील साताऱ्यात लग्नासाठी गेलेल्या तरुणांच्या वाहनाला अपघात झाला आणि दोघा जीवलग मित्रांचा मृत्यू झाला. यात मंगळवारपेठेतील अनेगा वडा सेंटरच्या मालकांच्या मुलाचा समावेश आहे.
सातारा येथे बुधवारी होणाऱ्या लग्नासाठी कोल्हापुरातून तीन तरूण खासगी गाडी (एम एच ०९ एफ बी ६७८०) तून मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास साताऱ्याकडे गेले होते.
मित्राच्या लग्नानंतर वर्षापर्यंटनासाठी ते कास पठारावर गेले होते. तेथून रात्री एकच्या सुमारास परतत असताना साताऱ्यात कारला अपघात झाला. ती एका ओढ्यात गेली.
यात अनिकेत आणि आदित्यचा जागीच मृत्यू झाला.
हा अपघात झाल्यानंतर उपचारादरम्यान अनिकेत राजेंद्र कुलकर्णी (वय २३) रा. मंगळवार पेठ, कोल्हापूर, आदित्य प्रताप घाडगे (वय २३) रा. कसबा बावडा यांचा मृत्यू झाला.अनिकेत हा मंगळवार पेठेतील प्रसिद्ध अनेगा वडा सेंटरचे मालक राजेंद्र कुलकर्णी यांचा मुलगा होय.
गेले काही दिवस तो वडिलांना व्यवसायात मदत करत होता. अनिकेतचे १२ वी पर्यंतचे शिक्षण संजीवनी स्कूलमध्ये झाले होते.
सध्या तो हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, चुलते असा परिवार आहे.
तो एकुलत्या मुलाचा अपघाती मृत्यू झाल्याने त्याच्या आई वडिलांना प्रचंड धक्का बसला.
या दुर्दैवी घटनेने मंगळवार पेठेत शोककळा पसरली आहे.
VERY SAD NEWS.... bhavapurna shradhanjali 🙏🙏
उत्तर द्याहटवा