हेमंत कांबळे : कोल्हापूर शहर प्रतिनिधी
कोल्हापूर : गुन्हेगारांची खडानखडा माहिती असलेले आणि उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस अनेकदा पटकावलेले पोलिस हवालदार अशोक पाटील (वय ५१) यांचे शुक्रवारी निधन झाले. गेल्या दोन दिवसांपासून ते रुग्णालयात दाखल होते.
पोलिस दलातील डॅशिंग पण हळवा कर्मचारी म्हणून त्यांची ओळख होती. सध्या अशोक पाटील शाहूपुरी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. आज त्यांचा मृत्यू झाला.
पाटील मुळचे निगवे खालसा (ता. करवीर) येथील रहिवाशी होते. त्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यासह लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा, राजारामपुरी पोलिस ठाण्यात कार्यरत होते.शहरासह परिसरातील गुन्हेगाराच्या कारनाम्यांची त्यांना खडानखडा माहिती होती.विशेष कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षकांकडून त्यांनी अनेक बक्षिसे पटकावली आहेत.
प्रकृती अस्वस्थतामुळे दोन दिवसापुर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना दुपारी त्यांचा मृत्यू झाला.
पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.पोलिस म्हटले की आपल्यासमोर गणवेशधारी करारी मुद्रेतील व्यक्ती उभी राहते.मात्र, पाटील यांची शरीरयष्टीच अशी होती की अशोक पाटील यांना साध्या वेशात पाहिले तरी गुन्हेगार वचकून असत.धिप्पाड शरीरयष्ठी आणि करारी नजर हे त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभून दिसत असत.पाटील यांना आपल्या हद्दीतील खडा न खडा माहिती असे. त्यांचा गुन्हेगारांवर वचक असे. ज्या ठाण्यात नियुक्ती व्हायची तेथे अधिकारीही निर्धास्त असत. १९९२ साली ते पोलिस दलात भरती झाले.
कॉलेज जी जीवनात कुस्ती आणि गोळाफेक या क्रीडा प्रकारात ते चॅम्पियन होते. दोन महिन्यांपासून ते आजारी होते.गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावत गेली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच पोलिस दलातील त्यांचे मित्र आणि सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी त्यांना आदरांजली वाहिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा