गीता माने : सहसंपादक
जयसिंगपूर येथील दत्त कॉलनी मधील हिंदवी स्पोर्टसच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ५२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी मोफत हृदय रोग चिकित्सा निदान व शस्त्रक्रिया, मोफत नेत्र तपासणी व नेत्र उपचार शिबीर त्याचबरोबर वृक्षारोपण असा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
राजेंद्र पाटील सोशल फौउंडेशनच्या सहकार्याने आणि अमरसिंह खाडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संयुक्त कार्यक्रमाच्या सुरुवातीस हृदयरोग व चिकित्सा निदान व शस्त्रक्रिया, लायन्स नेत्र लॅब रुग्णालय मिरज यांच्या सहकार्याने झालेल्या नेत्र तपासणी तसेच रक्तदान शिबिराचे उद्घाटन आदित्य पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते व अमरसिंह खाडे यांच्या प्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी दानोळी येथील देवराई फौंऊडेशनच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले.
त्याच बरोबर डेंगू मलेरियाच्या वाढत्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी दत्त कॉलनी, हेरवाडे कॉलनी, प्रियदर्शनी कॉलनी, उज्वल हाऊसिंग सोसायटी, मारुती पार्क, महाडिक कॉलनी, दिपनगर, खामकर कॉलनी येथे धूर फवारणी करण्यात आली. याकार्यक्रमात अमरसिंह खाडे यांचा वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दोन दिवस चाललेल्या या संयुक्त कार्यक्रमास उपनगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, नगरसेवक सर्जेराव पवार, संभाजी मोरे, राहुल बंडगर, गुंडाप्पा पवार, माजी नगराध्यक्ष राजेंद्र नांद्रेकर, राजेंद्र शहापुरे, राजेंद्र झेले, पोलिस उपनिरिक्षक प्रमोद वाघ, अजित पाटील, दादासो पाटील-चिंचवाडकर, डॉ. अर्जुन आडनाईक, डॉ. सचिन आसगेकर, डॉ. मधुकर जाधव, डॉ. अभिनंदन मोरे, डॉ. दीपाली माळी यांच्यासह हिंदवी स्पोर्टस, राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फौंऊडेशनचे सर्व पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फौंऊडेशन व हिंदवी स्पोर्टसच्या या अभिनव व समाजोपयोगी कामाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा